Join us

'फतेह' चित्रपटात सोनू सूद करणार दमदार अ‍ॅक्शन, घेतोय खास मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 20:38 IST

Sonu Sood : सोनू सूद त्याच्या आगामी अ‍ॅक्शन-पॅक्ड चित्रपट फतेहसाठी सज्ज आहे, ज्यामध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेले अ‍ॅक्शन सीन प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

सामान्य जनतेला भावणारा अभिनेता आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणून सोनू सूद (Sonu Sood) प्रसिद्ध आहे. सोनू सूद त्याच्या आगामी अ‍ॅक्शन-पॅक्ड चित्रपट फतेहसाठी सज्ज आहे, ज्यामध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेले अ‍ॅक्शन सीन प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. सोनू सूद सध्या त्याच्या आगामी 'फतेह' या हाय-ऑक्टेन अॅक्शन चित्रपटासाठी २४ तास मेहनत करत आहे. यात सोनू एका नव्या रूपात दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. आपल्या व्यक्तिरेखेला उचित न्याय देण्यासाठी तो कॅमेरामागे कठोर परिश्रम घेत आहे. याचीच एक झलक त्याने रिव्हील केलेल्या एका व्हिडिओमध्ये पहायला मिळते. 

सोनू सूदने अभिनयापलीकडे जाऊन लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याचं काम नेहमीच केलं आहे. याच कारणामुळे पडद्यावर बॅड बॅाय साकारणारा सोनू वास्तवात गुड बॅाय म्हणूनच ओळखला जातो. 'फतेह'मधील भूमिकेसाठी सोनू वर्कआऊट करत आहे. यातील व्यक्तिरेखेसाठी त्याने खास तयारी केल्याचं समजतं.

 'फतेह'मधील सर्व अॅक्शन सीक्वेन्स सोनू सूद स्वत: करत आहे. या चित्रपटासाठी सोनू आणि जॅकलीन यांनी अफलातून स्टंट्स केल्याच्या बातम्या अलीकडेच आल्या आहेत. त्यामुळे सोनूला नव्या रूपात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. फतेहमध्ये सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शिवज्योती राजपूत आणि विजय राज सुद्धा वेगळ्या भूमिकेत आहेत. वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट येणार आहे.

टॅग्स :सोनू सूद