Join us

Simmbaच्या रिलीजच्या एक दिवस आधी रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे सोनू सूद, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 14:35 IST

रोहित शेट्टीचा सिम्बा रिलीज होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. सिम्बाच्या टीमने प्रमोशन करण्यास कोणतीच कसर सोडली नाही. मात्र सोनू सूद रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे

ठळक मुद्देसोनू रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहेसिम्बामध्ये सोनू सूद मुख्य व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे

रोहित शेट्टीचासिम्बा रिलीज होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. सिम्बाच्या टीमने प्रमोशन करण्यास कोणतीच कसर सोडली नाही. मात्र सोनू सूदरोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे. कारण त्याला प्रमोशनसाठी बोलवण्यात आले नव्हते. 

फर्स्ट पोस्टच्या रिपोर्टनुसार  सोनू सूद सिम्बाच्या निर्मात्यावरदेखील नाराज आहे. सोनूने टीमकडे देखील आपली नाराजगी व्यक्त केली आहे. त्याचे झाले असे की, सिम्बाच्या प्रमोशनच्या हिस्सा बनणार होता. यासाठी त्याने डेट्ससुद्धा फिक्स करुन ठेवल्या होत्या मात्र प्रमोशन सुरु झाले आणि निर्मात्यांनी सोनूला लांब ठेवले. फक्त सारा अली खान आणि रणवीर सिंगलाचा प्रमोशनसाठी पुढे केले. हीच गोष्ट सोनूला खटकली. त्यांने याबाबत निर्मात्यांकडे तक्रार देखील केली.   

सिम्बामध्ये सोनू सूद मुख्य व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे.‘सिम्बा’हा  चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘सिम्बा’या सिनेमात रणवीरपहिल्यांदा पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. या सिनेमातील ‘आंख मारे और लडकी आंख मारे...’चे रिमिक्स व्हर्जनला लोकांनी डोक्यावर उचलले आहे. उद्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :सिम्बारणवीर सिंगसोनू सूदसारा अली खानरोहित शेट्टी