Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनू सूदने सिद्धेश चौहानसाठी लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:07 IST

सामुराई कलेक्शनचे कपडे परिधान करून अभिनेता सोनू सूद रॅम्पवॉकवर थिरकला आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

ठळक मुद्देसामुराई आणि त्यांच्या जीवनशैलीचा फॅन - सोनू सूद

जे डब्लू लाइफस्टाइल इंडिया लि.चे संचालक सिद्धेश चौहान यांनी 'लॅक्मे फॅशन वीक २०१८' मध्ये आपल्या नावाच्या लेबल अंतर्गत सामुराई प्रेरित असे प्रेरणादायी कलेक्शन सादर केले. सामुराई कलेक्शनचे कपडे परिधान करून अभिनेता सोनू सूद रॅम्पवॉकवर थिरकला.

डिझायनर सिद्धेश चौहानासाठी रॅम्प करणाऱ्या सोनू सूद याने असे सांगितले की, 'मी सामुराई आणि त्यांच्या जीवनशैलीचा फॅन आहे. जॅकी चॅन यांचा मी फॅन आहेच त्याच्याबरोबर काम करणे आणि मार्शल आर्ट्स जाणून घेण्यासाठी जेव्हा मी सिद्धेश यांची भेट घेतली तेव्हा मला त्यांच्या कामामुळे थक्क व्हायला झाले. या संकलनात त्याने सामुराईंच्या शिस्त व निर्भयतेला खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शित केले आहे. त्यांच्या या दृष्टिकोनाचा मी एक भाग असल्याचा मला आनंद वाटत आहे. 'डिझायनर सिद्धेश चौहान म्हणाले, 'लॅक्मे फॅशन वीकचा पहिल्यांदाच भाग झाल्याचा मला आनंद झाला आहे. या संग्रहाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. प्रत्येक संग्रहात मी स्वच्छ आणि किमान पोत ठेऊन, रंग आणि फॅब्रिक्सचे संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. 'ते पुढे म्हणाले, 'सोनू सूदचा मी आभारी आहे त्याने माझे स्वप्न जिवंत केले आहे. जेव्हा मी या संकल्पनेबद्दल विचार केला तेव्हा सर्वात आधी माझ्या मनात त्याचाच विचार आला. त्याच्याबरोबर आमचे चांगले संबंध आहेत.' 

 

टॅग्स :सोनू सूद