Join us
Daily Top 2Weekly Top 5

ढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 19:50 IST

सोनम कपूरची बहिण रिया कपूर लहान मुलीसारखी रडली होती. यामागचं कारण खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर सांगितले.

बॉलिवूड निर्माती रिया कपूर घरातील नवीन सदस्य आजारी पडल्यामुळे ढसाढसा रडली होती. ही गोष्ट खुद्द तिनेच सोशल मीडियावर सांगितली आहे. हा सदस्य म्हणजे तिचा कुत्रा. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर कुत्र्याचा फोटो शेअर केला ज्याचे नाव रसेल क्रो कपूर ठेवले आहे. रियाने हे देखील सांगितले की, कुत्र्याला आजारी पाहून ती कशी घाबरली.

रिया कपूरने लिहिले की, पहिल्या दोन दिवसात तो आजारी पडला होता. त्यामुळे मी घाबरली होती. कित्येक महिन्यांनंतर मी एका लहान मुलीसारखी रडले. आतापासून हा माझा सगळे काही आहे.

तिने रसेलला जगासमोर सादर करत लिहिले की, माझ्या कुटुंबात नवीन सदस्य आला आहे. ज्याचे नाव आहे रसेल क्रू कपूर. तो संपूर्ण घरभर धावतो आहे. हा आता फक्त ५५ दिवसांचा आहे आणि खूप गोड आहे.

अनिल कपूरच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य अभिनय क्षेत्राशी जोडला गेला आहे. लेक सोनम कपूर ही एक आघाडीची नायिका आहे. मुलगा हर्षवर्धन याने हिंदी चित्रपटसृष्टीत मिर्झिया चित्रपटातून पाऊल ठेवलं आहे. मात्र त्यांची लेक रिया कपूर मात्र अभिनय क्षेत्रात आलेली नाही. यामागचं कारण आहे ते तिचे वडील अभिनेता अनिल कपूर. त्यामुळे या चित्रपटसृष्टीचा भाग असूनही ती प्रसिद्धीपासून दूर असते. अभिनेत्री बनण्यापासून पापा अनिल कपूर यांनी रोखलं होतं असं रियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

केवळ अभिनेत्रीची बहिण किंवा तिच्यापुढे झाकोळली जाऊ नये अशी पापा अनिल कपूर यांना भीती होती. त्यामुळेच 'वेकअप सिद' चित्रपटाच्या सेटवरील पहिल्याच अनुभवात कल्पना आली होती की अभिनेत्री बनू शकणार नाही असं रियाने या मुलाखतीत सांगितले.

टॅग्स :सोनम कपूरअनिल कपूर