अनिल कपूरची मोठी मुलगी सोनम कपूर गतवर्षी लग्नबंधनात अडकली. सोनमनंतर अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर ही सुद्धा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा ब-याच दिवसांपासून रंगतेय. निर्माता करण बुलानी याला दीर्घकाळापासून रिया डेट करतेय, असे मानले जात होते. आता रियाची बहीण सोनम कपूर हिने स्वत: रियाच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. होय, रिया व करण एकमेकांना डेट करत आहेत. आत्ता नाही तर गेल्या दहा वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. रिया व करण लग्न करणार असतील, तर त्यांच्या लग्नाची बातमी तुमच्याशी शेअर करताना मला अतिशय आनंद होईल. पण यंदा तरी त्यांचा लग्नाचा विचार नाही, असे सोनमने ताज्या मुलाखतीत सांगितले.
दहा वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत...! सोनम कपूरने बहिणीबद्दल केला मोठ्ठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 12:09 IST
अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर ही निर्माता करण बुलानी याला दीर्घकाळापासून डेट करतेय, असे मानले जात होते. आता रियाची बहीण सोनम कपूर हिने स्वत: रियाच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे.
दहा वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत...! सोनम कपूरने बहिणीबद्दल केला मोठ्ठा खुलासा!
ठळक मुद्दे काही महिन्यांपूर्वी अनिल कपूरने रियाच्या कथित बॉयफ्रेन्डची भेट घेतली होती. मुंबईच्या एका रेस्टॉरंटबाहेर त्यांना पाहिले गेले होते. या फॅमिली डिनरचे फोटोही व्हायरल झाले होते.