Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली बेंद्रे आणि Orry ने जया बच्चन यांची केली नक्कल, रिक्रिएट केला 'तोच' क्षण, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:12 IST

ओरी म्हणजेच ओरहान अवत्रामणी याने जया बच्चन यांची नक्कल केल्याचं पाहायला मिळालं आहे. 

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या नेहमीच त्यांच्या तापट स्वभावासाठी ओळखल्या जातात. जया जेव्हा कधी पापाराझी किंवा फोटोग्राफर्स समोर येतात, तेव्हा त्या नेहमीच चिडलेल्या दिसतात. अनेकदा त्यांना फोटोग्राफर्सवर ओरडतानाही पाहिलं गेलंय. आता ओरी म्हणजेच ओरहान अवत्रामणी याने जया बच्चन यांची नक्कल केल्याचं पाहायला मिळालं आहे. 

ओरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अंबानीपासून ते अनेक बॉलिवूड कलाकार त्याचे मित्र आहेत. बॉलिवूडच्या मोठमोठ्या पार्टीला ओरीला आवर्जून आमंत्रण दिलं जातं. नुकतंच दिवाळी पार्टीत ओरी पोहचला होता. या पार्टीत तो सोनाली बेंद्रेसोबत दिसला. यावेळी सोनाली बेंद्रेसोबत त्याने एक व्हिडीओ बनवला. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

काही दिवसांपुर्वी आयरा खान आणि नुपूर शिखऱे यांच्या रिसेप्शनला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. जया बच्चनसुद्धा मुलगी श्वेता नंदासोबत याठिकाणी पोहोचल्या होत्या. यावेळी जया बच्चन मुलगी श्वेता बच्चनबरोबर पापाराझींसाठी पोज देत होत्या. यावेळी सोनालीला पाहताच श्वेता एकत्र पोज देण्यास तिला बोलावते. श्वेताजवळ सोनाली बेंद्रे उभी राहते. तर सोनाली पुढे येताच जया बच्चन दुर्लक्ष करत तिथून निघून जातात. ही घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

आता ओरी आणि सोनाली यांनी तोच क्षण गमतीत पुन्हा रिक्रेअट केला. यात जया बच्चनप्रमाणे ओरी हा वागताना पाहायला मिळतोय. व्हिडीओमध्ये दिसते की सोनाली त्याच्याकडे येताच ओरीही जया यांच्याप्रमाणे तिथून निघून जातो. हा व्हिडीओ शेअर करताना ओरीने लिहिले आहे की, "सामाजिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच माझा मूड असा असतो". ओरीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत 

टॅग्स :सोनाली बेंद्रेजया बच्चनदिवाळी 2024