Join us

सोनाक्षी सिन्हाचा रौद्रावतार! 'जटाधरा'चा अंगावर काटा आणणारा टीझर, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:27 IST

'जटाधरा' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये सोनाक्षी सिन्हाचा आजवर कधीही न पाहिलेला लूक बघायला मिळतोय

सोनाक्षी सिन्हाचे गेल्या काही काळातले बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. ओटीटीवर जे सिनेमे रिलीज झाले, त्यांचीही इतकी चर्चा दिसली नाही. अशातच सोनाक्षीचा आगामी महत्वाकांक्षी सिनेमा ‘जटाधरा’ची उत्सुकता शिगेला आहे. या बहुप्रतिक्षित सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सोनाक्षीसोबत साऊथ अभिनेता सुधीर बाबू प्रमुख भूमिकेत आहेत. टीझरमध्ये दोघांचाही लूक आणि अभिनय विशेष लक्षवेधी ठरतोय. जाणून घ्या या सिनेमाबद्दल

सोनाक्षीचा रुद्रावतार, 'जटाधरा'चा टीझर रिलीज

'जटाधरा'चा टीझर खास आहे. सिनेमाची कथा पौराणिक असून या कथेत स्वार्थीपणा आणि बलिदान यामधील संघर्ष दिसतो. टीझरमध्ये सोनाक्षी सिन्हा एका शक्तिशाली आणि क्रूर देवीच्या रूपात दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा राग, डोळ्यांतील अंगार आणि भेदक आवाज या सगळ्यामुळे सोनाक्षीचा लूक आजवरच्या सिनेमांपेक्षा वेगळा ठरतोय. दुसरीकडे सुधीर बाबू शांत, पण दृढनिश्चयी योद्ध्याच्या रूपात आहे. त्याचा लूक साधा पण प्रभावी आहे. सोनाक्षी आणि सुधीरमध्ये शेवटी युद्ध होताना पाहायला मिळतं.

'जटाधरा' सिनेमातील प्रसंग, सेट डिझाईन आणि VFX तंत्रज्ञान उच्च दर्जाचे असून, प्रत्येक फ्रेम भव्य आणि नेत्रदीपक दिसते. टीझरमधील पार्श्वसंगीत आणि दमदार संवाद कथानकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहेत. भारतीय पौराणिकतेची छटा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम या सिनेमात दिसून येतो. ‘जटाधरा’चे दिग्दर्शन वेंकट कल्याण आणि अभिषेक जयसवाल यांनी केले असून, निर्मिती Zee Studios आणि प्रेरणा अरोरा यांनी केली आहे. हा अनोखा सिनेमा लवकरच सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाबॉलिवूडTollywood