Join us

'मिशन मंगल'मध्ये सोनाक्षी सिन्हा दिसणार ह्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 07:15 IST

'मिशन मंगल' चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्दे 'मिशन मंगल' चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत 'मिशन मंगल' चित्रपटात सोनाक्षी करणार गेस्ट अपियरेन्स

काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा आगामी सिनेमा 'मिशन मंगल'मधील कलाकारांचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये शर्मन जोशी, कृति कुलहारी, तापसी पन्नू, अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा व नित्या मेनन दिसत आहेत. या सिनेमात सोनाक्षी सिन्हा पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे.

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, 'मिशन मंगल' चित्रपटात सोनाक्षी गेस्ट अपियरेन्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी फक्त दहा ते पंधरा मिनिटांसाठी दिसणार आहे. तिच्या भूमिकेबद्दल सविस्तर समजू शकलेले नाही. असे बोलले जात आहे की सोनाक्षी या चित्रपटात खगोल शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे जी मिशनचा हिस्सा असणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला या महिन्यापासून सुरूवात होणार आहे. अक्षय कुमारने फॉक्स स्टार स्टुडिओने एक नाही दोन नाही तर तीन चित्रपट साईन केले आहेत. आर. बल्की यांच्या सहयोगाने बनत असलेला मिशन मंगल चित्रपटाचे दिग्दर्शन जगन शक्ती करणार आहेत. या चित्रपटात कित्येक लीडच्या नायिका आहेत. त्यात सोनाक्षी सिन्हा, विद्या व तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा बिग बजेटचा चित्रपट असणार आहे. फॉक्स स्टार व केप ऑफ गुड फिल्म्ससोबत भागीदारी केल्यामुळे अानंदित होऊन अक्षय कुमारने सांगितले की, फॉक्स स्टार स्टुडिओमध्ये नवीन क्रिएटिव्ह पार्टनर बनून मी खूप खूश आहे. या सहयोगाने आम्ही प्रेक्षकांना महत्त्वपूर्ण व मनोरंजन करणाऱ्या सिनेमांची मेजवानी देण्यात यशस्वी होऊ, अशी मला आशा आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाअक्षय कुमार