Join us

अर्ध्या किमतीत पाहता येणार अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार २', निर्मात्यांकडून खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:04 IST

अर्ध्या किमतीत पाहता येणार 'सन ऑफ सरदार २', जाणून घ्या काय आहे ऑफर

अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardaar 2) लवकरच प्रदर्शित होणार आहे. २०१२ साली आलेल्या 'सन ऑफ सरदार'चा हा सीक्वेल आहे. प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी निर्मात्यांनी  एक विशेष ऑफर जाहीर केली आहे. प्रेक्षकांना थिएटरमध्ये 'सन ऑफ सरदार २' चित्रपट अर्ध्या किमतीत पाहण्याची संधी मिळणार आहे. जिओ स्टुडिओने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

'सन ऑफ सरदार २' सिनेमाचं तिकीट जर प्रेक्षकांनी 'BookMyShow' या प्लॅटफॉर्मवरून बुक केले, तर त्यांना ५०% सूट मिळेल. त्यासाठी 'SOS2' हा कूपन कोड वापरणं आवश्यक आहे.अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' चित्रपटासमोर मोठं आव्हान आहे. कारण अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा 'सैयारा' अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे.  तिथेच दुसरीकडे 'वॉर २' येतोय.  अशा परिस्थितीत 'सन ऑफ सरदार २' हिट होईल की बॉक्स ऑफिसच्या स्पर्धेत चिरडला जाईल? याचे उत्तर लवकरच मिळेल.

'सन ऑफ सरदार'मध्ये अजय देवगण हा जस्सी रंधावाच्या भूमिकेत होता. आपल्या निरागस भूमिकेतून त्याने सर्वांना प्रेमात पाडलं होतं.  'सन ऑफ सरदार'चा पहिला भाग २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट त्यावेळी १४१.८९ कोटी रुपयांची कमाई करून सुपरहिट ठरला होता. यामुळेच दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांची आणि निर्मात्यांची मोठी अपेक्षा आहे.

टॅग्स :अजय देवगणबॉलिवूड