Join us

Kunal Khemu Tattoo :कुणाल खेमूने पायावर काढला नवा टॅटू, सोहा अली खाने शेअर केला मजेदार व्हिडीओ

By अमित इंगोले | Updated: October 31, 2020 14:17 IST

Kunal Khemu Tiger Tattoo : नुकताच सोहाने एक मजेदार व्हिडीओ तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला. ज्यात कुणाल खेमू पायावर नवा टॅटू बनवताना दिसत आहे. 

अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमूKunal Khemu हे बॉलिवूडच्या क्यूट कपलपैकी एक मानलं जातं. दोघेही सोशल मीडियावर चांगलेच अ‍ॅक्टिव राहतात. ते इन्स्टाग्राम अकाउंटवर फॅमिलीचे फोटोज आणि व्हिडीओज बघायला मिळतात. नुकताच सोहाने एक मजेदार व्हिडीओ तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला. ज्यात कुणाल खेमू पायावर नवा टॅटू बनवताना दिसत आहे. 

सोहा अली खान कधी मुलीचे तर कधी पती कुणाल खेमूचे मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. तिचा यावेळचा व्हिडीओही तसाच मजेदार आहे. यात कुणार खेमू पायावर एक टॅटू काढून घेतोय. यात तो आधी असं म्हणतात ऐकायला मिळतं की, अजिबात वेदना होत नाही. पण नंतर टॅटू काढताना होणाऱ्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतात. 

सोहानेच हा व्हिडीओ शूट केला आहे. कोरोनामुळे सोहा आणि कुणाल व्हेकेशन मिस करत आहेत. त्यांच्या इन्स्टाग्रामवर हॉलिडेंजचे अनेक फोटो आणि व्हिडीओज बघायला मिळतात. नुकताच तिने कुणालसोबतच एक फोटो शेअर केला होता. हा फोटो रोममधील आहे.  

टॅग्स :सोहा अली खानकुणाल खेमूबॉलिवूडसोशल मीडिया