Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मनात कोणतीही शंका नाही, रणबीर कपूर..."; 'रामायण' सिनेमाचा टीझर पाहून मालिकेतील सीतेने खरं काय ते सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 20:12 IST

दूरदर्शनवरील ऐतिहासिक 'रामायण' मालिकेत सीता मातेची अजरामर भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी नितेश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटाच्या टीझरवर आपली महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे

दूरदर्शनवरील ऐतिहासिक 'रामायण' मालिकेत सीता मातेची अजरामर भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी नितेश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटाच्या टीझरवर आपली महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. या भव्य चित्रपटाचा टीझर पाहून त्या भारावून गेल्या असून, त्यांनी चित्रपटाच्या भव्यतेचे तोंडभरून कौतुक केले आहे. काय म्हणाल्या दीपिका?

'इंडिया टुडे'शी संवाद साधताना दीपिका चिखलिया यांनी चित्रपटाच्या भव्यता आणि मांडणीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, मी या चित्रपटाचा टीझर पाहिला असून तो अत्यंत भव्य आणि दिव्य वाटत आहे. चित्रपटातील दृश्ये अतिशय समृद्ध असून निर्मात्यांनी प्रत्येक बारकाव्यावर खूप चांगले काम केले आहे, अशाप्रकारे 'रामायण' मालिकेमधील सीता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाजींनी 'रामायणा'च्या या नवीन सादरीकरणाला मनापासून पाठिंबा दिला आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, हा चित्रपट खूपच सुंदर दिसत असून त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही शंका नाही. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत कशा प्रकारे दिसतो आणि ही कथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कशी मांडली जाते, हे पाहण्यासाठी त्या आता केवळ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. त्यांच्या या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे रणबीर कपूरच्या 'रामायण'ला आता जुन्या पिढीतील दिग्गज कलाकारांचाही आशीर्वाद मिळाला असल्याची चर्चा सिनेसृष्टीत रंगली आहे. 'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग याच वर्षी दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होणार असून संपूर्ण जगाला ही पौराणिक गाथा मोठ्या पडद्यावर बघण्याची उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ramayan Teaser: Original Sita Praises Ranbir Kapoor; No Doubts!

Web Summary : Deepika Chikhlia, famed Sita, lauded the 'Ramayan' teaser's grandeur. She expressed confidence in Ranbir Kapoor's portrayal and the film's modern retelling. Release is awaited.
टॅग्स :रामायण सिनेमारणबीर कपूरसाई पल्लवीबॉलिवूड