Shaan Buys Luxury Bungalow In Pune: केवळ सामान्य लोकच नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्स (Bollywood Actors) हे प्रॉपर्टी (Property)मध्ये मोठी गुंतवणूक करतात. मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जमीन खरेदी करणाऱ्यांची बॉलिवूडकरांची यादी मोठी आहे. या यादीत इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध गायकांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा शान याच नाव आवर्जून येतं. शानला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला आवडतं. नुकतंच शानने पुणे शहरात एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे.
पुण्यातील प्रभाचीवाडीमध्ये एक आलिशान प्लॉट-प्लस-बंगला शानने खरेदी केला आहे. यासाठी त्यानं तब्बल १० कोटी रुपये मोजले आहेत. स्क्वेअर यार्डकडे असलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार शान व त्याची पत्नी राधिका मुखर्जीने खरेदी केल्या प्लॉटचे क्षेत्रफळ सुमारे ०.४ हेक्टर आहे. तर बंगल्याचे क्षेत्रफळ हे ५५०० स्क्वेअर फूट आहे, यासाठी शानला ५० लाखांची मुद्रांक शुल्क भरावं लागलं आहे. तर ३० हजार नोंदणी फी भरावी लागली आहे.
प्रभाचीवाडी हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात स्थित एक परिसर आहे. स्क्वेअर यार्डनुसार, हा परिसर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसह अनेक मुख्य महामार्गांजवळ आहे. हा प्रॉपर्टी शानसाठी भविष्यात लाभदायी ठरणार आहे.