Join us

शॉर्ट्स घातली म्हणून स्टेजवरून खाली उतरवलं...! नेहा भसीननं सांगितला ‘शॉकिंग’ अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 15:19 IST

ताज्या मुलाखतीत नेहाने रिअल लाईफ किस्सा शेअर केला आणि तो ऐकून अनेकांना धक्का बसला.  

ठळक मुद्देअभिनेता सलमान खानच्या ‘सुल्तान’ चित्रपटातील ‘जग घुमेया; या गाण्यामुळे नेहा भसीन प्रकाशझोतात आली होती.  

‘सुल्तान’ सिनेमातील 'जग घुमियाँ' या गाण्यामधून रसिकांची लाडकी बनलेली गायिका म्हणजे नेहा भसीन. बॉलिवूडमधील बड्या गायिकांमध्ये तिचे नाव घेतले जाते. हीच नेहा भसीन एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, ताज्या मुलाखतीत नेहाने रिअल लाईफ किस्सा शेअर केला आणि तो ऐकून अनेकांना धक्का बसला.  होय, तोकडे कपडे घातल्यामुळे लोकांनी मला लाईव्ह शोदरम्यान स्टेजवरुन धक्का मारुन खाली उतरवले होते,असा धक्कादायक अनुभव तिने यावेळी सांगितला. 

 टाईम्स आॅफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहाने ही आपबीती सांगितली.ती म्हणाली, एका स्टेज शोदरम्यान मी शॉर्ट्स घालून परफॉर्म करणार होती. मी स्टेजवर एन्ट्री घेतली आणि मला अचानक स्टेजवरून खाली उतरवण्यात आले.  माझ्या तोकड्या कपड्यांवर त्यांना आक्षेप होता. मी असे कपडे घालून परफॉर्म करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. मला स्टेजवरून उतवणे हा माझा, एका कलाकाराचा अपमान होता.त्यावेळी मी तो अपमान गिळला. पण म्हणून स्वत:ला बदलले नाही. मी तेच केले, जे मला करायचे होते.त्यावेळी शॉर्ट्समध्ये मला लोकांनी नाकारले. पण इंडियन प्रो म्युझिक लीगमध्ये मी शॉर्ट्स घालून परफॉर्म केला आणि लोकांनी ते स्वीकारले, असेही ती म्हणाली.

  उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी अलीकडे महिलांच्या रिप्ड जीन्सबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावर नेहा भसीनने अलीकडे एक पोस्ट शेअर केली गेली होती.  ‘कोणत्याही महिलेच्या स्वप्नांची उंची तिचे कपडे, तिचे शरीर वा तिच्यावर थोपल्या गेलेल्या नियमांनी मापली जाऊ शकत नाही. तिचे स्वप्न स्वच्छ आहेत, निळ्यावर व अथांग सागरासारखे...,’ असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

अभिनेता सलमान खानच्या ‘सुल्तान’ चित्रपटातील ‘जग घुमेया; या गाण्यामुळे नेहा भसीन ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.  धुनकी लागे, कुछ खास है,  स्वैग से स्वागत, हिरीये  यांसारखी अनेक गाणी तिने गायली आहेत. 

टॅग्स :नेहा भसीन