Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mika Singh: सिंग इज किंग! मिका सिंगनं खरेदी केलं खासगी बेट, फक्त इतकंच नाही तर 7 बोटी, 10 घोडे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 12:10 IST

Mika Singh: सलमान खानपासून अक्षय कुमारपर्यंत प्रत्येक सुपरस्टारला आवाज देणाऱ्या मिकाने आता एक नवा कारनामा केला आहे. होय, मिकानं एक खासगी बेट विकत घेतलं आहे.

आपल्या गाण्यांनी लोकांना वेड लावणारा मिका सिंग (Mika Singh) बॉलिवूडचा एक लोकप्रिय सिंगर. सलमान खानपासून अक्षय कुमारपर्यंत प्रत्येक सुपरस्टारला आवाज देणाऱ्या मिकाने आता एक नवा कारनामा केला आहे. होय, मिकानं एक खासगी बेट विकत घेतलं आहे. सध्या या बेटावर मस्ती मज्जा करतानाचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओत मिका बोट चालवताना दिसतोय.मिका हा खासगी बेट खरेदी करणारा पहिला भारतीय गायक असल्याचा दावा या व्हिडीओसोबत केला जात आहे. या बेटासोबत 7 बोटी, 10 घोडेही खरेदी केले आहेत.

 मिकाचा हा व्हिडीओ पाहून त्याचे फॅन्स क्रेझी झाले आहेत. व्हिडीओवर चाहते एकापेक्षा एक भारी कमेंट्स करत आहेत. सिंग इज किंग म्हणत अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मिका सिंग अलीकडे ‘स्वयंवर -मिका दी वोटी’ या शोमुळे चर्चेत होता. या शोमध्ये मिका स्वत:साठी लाईफ पार्टनर शोधण्यासाठी गेला होता. सरतेशेवटी मिकाने लग्नासाठी आकांक्षा पुरीची निवड केली होती.

 मिकाचं खरं नाव अमरिक सिंग आहे. त्याला 6 भाऊ आहेत. लोकप्रिय सिंगर दलेर मेहंदी त्याचा मोठा भाऊ आहे. भावाच्या बँडसोबत गिटारिस्ट म्हणून मिकानं सुरूवात केली होती. ‘सावन में लग गई आग’ हा त्याचा पहिला अल्बम होता. हा हिट झाला आणि सोबत मिकाही हिट झाला. मिकाच्या आवाजातील रांगडेपणा लोकांना भावतो. त्याच्या बिनधास्त गाणी तुम्हाला थिरकायला भाग पाडतात.

2006 साली ‘अपना सपना मनी मनी’ या सिनेमातील ‘दिल में बजी गिटार’ हे मिकाचं गाणं तुफान गाजलं. यानंतर त्याने एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली.  मिका सिंगला आलिशान वाहने आणि बंगल्यांचाही शौक आहे. मिका त्याच्या एका गाण्यासाठी सुमारे 15 लाख रुपये घेतो.  मिकाची एकूण संपत्ती सुमारे 13 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 96 कोटी रुपये इतकी आहे. 

टॅग्स :मिका सिंगबॉलिवूडसेलिब्रिटी