Join us

१०० ते १५० रुपयांसाठी लग्नात गाणी गायचा, आज जगभरात गाजतोय 'या' गायकाचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 19:24 IST

आज जगभरात त्याच्या आवाजाची जादू पोहोचली आहे.

कोणत्याही क्षेत्रात स्ट्रगल आणि मेहनतीला पर्याय नाही. नाव आणि पैसा कमवण्यासाठी तुम्हाला दिवस रात्र मेहनत घेणं आहे. त्यातही तुमच्याजवळ कोणतीही ओळख नसेल तर तुम्हाला शून्यातून सगळं उभं करणं आहे. असाच एका गायक सध्या चर्चेत आहे जो एकेकाळी लग्नात गाणी गाऊन पैसे कमवायचा. आज जगभरात त्याच्या आवाजाची जादू पोहोचली आहे. कोण आहे तो गायक?

बॉलिवूड नाही तर पंजाबी इंडस्ट्रीतून वर आलेला हा गायक आहे गुरु रंधावा (Guru Randhawa). त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. वयाच्या ९ व्या वर्षापासूनच तो गाणी गात आहे.  पंजाबमधील एका छोट्या गावातून गुरु आला आहे. सुरुवातीला तो गावात होणाऱ्या लग्नात गाणी गायचा आणि पैसे कमवायचा. याचे त्याला १०० ते १५० रुपये मिळायचे. इथूनच त्याच्या स्ट्रगलची सुरुवात झाली होती. गायक व्हायचं हे त्याने आधीच निश्चित केलं होतं. त्याचं मन दुसऱ्या कशातच लागत नव्हतं. शेवटी त्याला पंजाबी इंडस्ट्रीत ब्रेक मिळाला आणि त्याचा प्रवास सुरु झाला. गुरु जेव्हा ३ मार्च २०१३ रोजी पहिल्यांदा टीव्हीवर आला तेव्हा संपूर्ण गावाने टीव्हीसमोर बसून त्याला पाहिले होते. गावातील सर्वच लोकांना त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. त्याने अनेक स्टार अभिनेत्रींसोबत म्युझिक अल्बम रिलीज केले. यामध्ये त्याने स्वत: अभिनयही केला. 

गुरु रंधावा त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. त्याला गाण्यासोबतच अभिनयाचीही आवड आहे. 'कुछ खट्टा हो जाए' सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याच्यासोबत सई मांजरेकर दिसली. शहनाज गिलसोबतही त्याचा म्युझिक अल्बम आला ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 'नाच मेरी रानी','लाहोर','पटोला' अशी अनेक हिट गाणी त्याने दिली आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसंगीत