गायक दिलजीत दोसांझ हा सध्या जगभरात त्याच्या म्यूझिक कॉन्सर्टचे शो आयोजित करताना दिसतो. दिलजीतचा लाइव्ह म्यूझिक कॉन्सर्ट पाहायला त्याचे असंख्य चाहते हजेरी लावताना दिसतात. दिलजीत त्याच्या खास आवाजाने आणि श्रवणीय गाण्यांनी उपस्थित प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसतो. दिलजीतच्या कॉन्सर्टदरम्यान अनेक वादग्रस्त गोष्टीही घडताना दिसतात. दिलजीतच्या कॉन्सर्टदरम्यान अशीच एक गोष्ट घडलीय. ज्यामुळे दिलजीतला १५ लाखांचा दंड भरावा लागणार आहे.
दिलजीतला १५ लाखांचा दंड भरावा लागणार
दिलजीत दोसांझचा अलीकडेच चंदीगढमध्ये कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टच्यावेळी दिलजीतकडून महत्वाच्या नियमाचं उल्लंघन झालं. चंदीगढमधील कॉन्सर्टमध्ये दिलजीतने ध्वनी प्रदुषणासंबंधीच्या नियमाचं उल्लंघन केलं. त्यामुळे दिलजीत आणि त्याच्या टीमला १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. दिलजीतच्या टीमला यासंंबंधी नोटिस बजावण्यात आलीय. यामुळे दिलजीतच्या म्यूझिक कॉन्सर्ट टूरवर नक्कीच परिणाम झालाय.
चंदीगढमध्ये दिलजीतचा कॉन्सर्ट जिथे झाला त्या क्षेत्रात ७५ डेसिबलपर्यंतची मर्यादा होती. परंतु कॉन्सर्टदरम्यान दिलजीतने ही मर्यादा ओलांडली. दिलजीतच्या म्यूझिक कॉन्सर्टची डेसिबल क्षमता ७६.१ ते ९३.१ या लेव्हलला गेली. त्यामुळे चंदीगढमधील नागरी संस्थेने दिलजीतला आवाजाच्या डेसिबलची मर्यादा ओलांडल्याने १५ लाखांचा दंड सुनावला आहे. याआधीही दिलजीतच्या म्यूझिक कॉन्सर्टदरम्यान कधी भोंगळ व्यवस्थापन, गर्दी अशा गोष्टींमुळे वाद निर्माण झालाय.