Arijit Singh set to make directorial debut: भारतीय संगीत क्षेत्रात अरिजीत सिंहच्या (Arijit Singh) आवाजाची जादू दूरवर पसरलेली आहे. प्रत्येक सिनेमात त्याचं गाणं आहे. आपल्या साधेपणामुळे आणि अप्रतिम टॅलेंटमुळे त्याने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. अगदी हॉलिवूड गायकांसोबतही त्याने कोलॅब केलं आहे. हिंदी सिनेमातील त्याची रोमँटिक गाणी हिट होतातच यात शंकाच नाही. आता अरिजीत करिअरमध्ये आणखी एक प्रयोग करणार आहे. तो थेट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, अरिजीत सिंहने दिग्दर्शक म्हणून सिनेमा साईन केला आहे. निर्माते महावीर जैन सिनेमाची निर्मिती करणार आहे. जंगल अॅडव्हेंचरवर आधारित हा पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. सिनेमासाठी अरिजीत खूप उत्साहित आहे. अनेक दिवसांपासून त्याला सिनेमा दिग्दर्शित करण्याची इच्छा होती. यासाठी तो शांतपणे त्याचा वेळ घेत स्क्रिप्टवर काम करत होता. कोएल सिंहसोबत मिळून त्याने सिनेमाच्या लिखाणाचंही काम केलं आहे.
तसंच रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की स्क्रिप्ट लॉक झाली असून आता सिनेमा कास्टिंग स्टेजवर पोहोचला आहे. अरिजीतसाठी हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळेच तो स्वत: टीमसोबत प्री-प्रोडक्शनचं काम पाहत आहे. पुढच्या महिन्यापर्यंत सिनेमाच्या कास्टवरही शिक्कामोर्तब होईल. पॅन इंडिया प्रेक्षकांसाठी हा सिनेमा बनवण्याची अरिजीतची महत्वाकांक्षा आहे.
अरिजीत सिंह टॅलेंटेड प्रोफेशनल गायक आहे. त्यामुळे तो करत असलेला सिनेमाही तेवढाच खास असणार असा चाहत्यांना विश्वास आहे. अरिजीतला दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. तसंच २०१५ मध्ये त्याला पद्मश्री पुरस्कारनेही गौरवण्यात आले.