Sidharth Malhotra and Kiara Advani welcomes Baby Girl : बॉलिवूडमधील हॉट अँड फिट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आई-बाबा झाले आहेत. मंगळवारी या जोडप्याला कन्यारत्न प्राप्ती झाली. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने फेब्रुवारीमध्ये तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. इंस्टाग्रामवर गोंडस लहान बाळाच्या मोज्यांचा फोटो शेअर करून त्यांनी गुड न्यूज शेअर केली होती. त्यानंतर आज कियाराने गोंडस मुलीला जन्म दिला आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा 'नन्हीं परी'चा बाबा झाला. कियारा किंवा सिद्धार्थ यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सेलिब्रिटी पापाराझी अकाउंट व्हायरल भयानी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे आणि कियारा आई झाल्याची माहिती दिली आहे.
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी मंगळवारी पालक म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली. मिळालेल्या वृत्तानुसार, कियारा अडवाणीने मुलीला जन्म दिला. अलीकडेच सिद्धार्थ कियाराला रुग्णालयात घेऊन जाताना दिसला होता. यासोबतच दोघांचे कुटुंबीयही रुग्णालयात दिसले होते. त्यानंतर आज ही गोड बातमी आली. बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याचेही सांगितले जात आहे.
सिद्धार्थ कियाराच्या मुलीचे नाव
सिद्धार्थ कियाराने अद्याप ही आनंदाची बातमी स्वतः जाहीर केलेली नाही. पण सर्वजण अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. यासोबतच, चाहते सिद्धार्थ-कियाराच्या मुलीची पहिली झलक आणि तिचे नाव ऐकण्यासाठीही आतुरतेने वाट पाहत आहेत.
सिद्धार्थ-कियाराचं आधी डेटिंग, मग लग्न...
कियारा आणि सिद्धार्थ २०२० पासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी २०२३ मध्ये लग्न केले. त्यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथे लग्न केले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघेही आता एका गोड मुलीचे आई-बाब झाले आहेत.