सध्या सिनेसृष्टीत व्ही. शांताराम यांच्या बायोपिकची खूप चर्चा आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी या बायोपिकमध्ये व्ही. शांताराम यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. व्ही. शांताराम यांचे चिरंजीव किरण शांताराम यांनी एका कार्यक्रमात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा सन्मान करताना आपल्या वडिलांच्या बायोपिकसाठी त्याची निवड अगदी योग्य असल्याचे सांगितले.
एका कार्यक्रमात किरण शांताराम यांनी वडिलांच्या समृद्ध कारकीर्दीला आदरांजली म्हणून तयार होत असलेला हा चित्रपट त्यांच्यासाठी विशेष आहे, अशी भावना व्यक्त केली. कारण हा चित्रपट व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीदिनी, म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यांनी हेही नमूद केले की, व्ही. शांताराम हे त्या अग्रगण्य चित्रपटकारांपैकी एक होते ज्यांनी भारतीय सिनेमाला मूकपटांच्या काळापासून पुढे रंगीत चित्रपटांच्या युगापर्यंत नवी दिशा दिली.
यावेळी किरण शांताराम यांनी सिद्धांत चतुर्वेदीवर पूर्ण विश्वास व्यक्त करत सांगितले की, त्यांच्या वडिलांची भूमिका सिद्धांतसारखा समर्थ अभिनेता साकारत असल्याचा त्यांना आनंद आहे आणि तो या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देईल.
महान दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या सर्जनशील प्रवासाची अनोखी कहाणी या चित्रपटात दाखवली जाणार आहे. त्यांनी 'दो आँखें बारह हाथ', 'नवरंग' आणि 'झनक झनक पायल बाजे' यांसारख्या क्लासिक चित्रपटांची निर्मिती केली होती. सामाजिक विषय आणि प्रयोगशील सिनेमांचा खास अनोखा संगम त्यांच्या चित्रपटांत दिसून येतो, ज्याने भारतीय कथाकथनाच्या शैलीवर खोल प्रभाव टाकला.
चित्रपटसृष्टीतील जाणकारांच्या मते, 'गली बॉय' मध्ये ‘एमसी शेर’ या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सिद्धांत चतुर्वेदीसाठी व्ही. शांताराम यांची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाच्या भूमिकांपैकी एक ठरू शकते. सिद्धांतनेही व्ही. शांताराम यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाबद्दल आदर व्यक्त करताना सांगितलं की, हा बायोपिक नव्या पिढीला व्ही. शांताराम यांच्या प्रेरणादायी प्रवासाची ओळख करुन देईल. याशिवाय त्यांच्या समृद्ध कारकीर्दीला हा सिनेमा उजाळा देईल.
Web Summary : Siddhant Chaturvedi will portray V. Shantaram in his biopic. His son, Kiran Shantaram, believes Siddhant is perfect, honoring his father's legacy. The film, celebrating Shantaram's 125th birth anniversary in 2026, will highlight his impact on Indian cinema.
Web Summary : सिद्धांत चतुर्वेदी वी. शांताराम की बायोपिक में उनकी भूमिका निभाएंगे। उनके बेटे, किरण शांताराम का मानना है कि सिद्धांत बिल्कुल सही हैं, जो उनके पिता की विरासत का सम्मान करेंगे। यह फिल्म 2026 में शांताराम की 125वीं जयंती पर रिलीज होगी।