Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा व्हॅलेंटाईन होणार खास! सिद्धांत-मृणाल ठाकुरचा 'दो दीवाने सहर में'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:16 IST

मृणालच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

मृणाल ठाकुर आणि सिद्धांत चतुर्वेदी ही फ्रेश जोडी असलेला 'दो दीवाने शहर मे' सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. या सिनेमाचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालं आहे. या फ्रेश जोडीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसंच मृणालच्या सौंदर्यावर तरुणाई भाळली आहे. सिद्धांतनेही आपल्या चार्मिंग लूकमधून लक्ष वेधून घेतलं आहे. कसा आहे सिनेमाचा ट्रेलर?

'दो दीवाने शहर मे' च्या १ मिनिट ५८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये मॉडर्न लव्हस्टोरी दाखवली आहे. परफेक्शनच्या मागे धावत असताना भावनांच्या शोधात असलेल्या तरुणांची ही कहाणी आहे. यात गैरसमज, समाजाचा दबाव आणि भावनांचा रोलरकोस्टर असलेली एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या कपलची कहाणी आहे. ज्यात हिरोईन ऐनवेळी कोणतंही कारण न सांगता लग्नाला नकार देते.  पुढे यांची कहाणी काय वळण घेते हे सिनेमात पाहायला मिळणार आहे.  

चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना निर्मात्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले की, "ही गोष्ट दोन अशा जीवांची आहे जे शहराच्या गर्दीत स्वतःला आणि प्रेमाला शोधत आहेत." सिद्धांत आणि मृणाल ही जोडी २०२६ मधील सर्वात हृदयस्पर्शी ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक ठरेल, असे बोलले जात आहे.

हा सिनेमा २० फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. सिद्धांत चतुर्वेदी, मृणाल ठाकुर यांच्याशिवाय सिनेमात इला अरुण, जॉय सेनगुप्ता, आयशा रजा, संदीपा धर, नवीन कौशिक यांचीही भूमिका आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Siddhant-Mrunal Thakur's 'Do Deewane Shehar Mein' trailer is out!

Web Summary : Mrunal Thakur and Siddhant Chaturvedi star in 'Do Deewane Shehar Mein,' a modern love story about finding love amidst life's pressures. The trailer showcases their chemistry and the film's exploration of relationships facing societal expectations and misunderstandings. Releasing February 20th.
टॅग्स :मृणाल ठाकूरसिद्धांत चतुर्वेदीबॉलिवूड