बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिने कालपरवाच फॅशन डिझाईनर मोनिषा जयसिंग हिच्यासोबत मिळून आपला MxS हा फॅशन ब्रँड लॉन्च केला. मुंबईत श्वेताच्या फॅशन स्टोरचे दणक्यात उद्घाटन झाले. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या उद्घाटनाला हजेरी लावली. अख्खी बच्चन फॅमिलीही यावेळी दिसली. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी श्वेताच्या स्टोर लॉन्चला हजेरी लावली.पण हा फॅशन ब्रँड लॉन्च होऊन दोन दिवस होत नाही तोच, त्यावर चोरीचे आरोप लावले गेलेत. ‘फॅशन कॉपीकॅट्स’ची पोलखोल करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नामक dietsabya इन्स्टाग्राम हँडलने ने एका नामांकित ब्रँडची नक्कल केल्याचा ठपका ठेवला आहे.