Join us

Shweta Bachchan : -तेव्हा माझं रक्त सळसळतं..., भाऊ अभिषेक बच्चनला ट्रोल करणाऱ्यांवर श्वेता बच्चन भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 18:35 IST

Shweta Bachchan, Abhishek Bachchan : बच्चन कुटुंबाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. याच बच्चन कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. सध्या चर्चा आहे ती अमिताभ यांची लाडकी लेक श्वेता बच्चन हिची.

बच्चन कुटुंबाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. याच बच्चन कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. अमिताभ बच्चन या ना त्या कारणानं सतत चर्चेत असतात. पण अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, श्वेता बच्चन आणि अगदी आराध्या बच्चन यांचीही चर्चा होताना दिसते. सध्या चर्चा आहे ती अमिताभ यांची लाडकी लेक श्वेता बच्चन (Shweta Bachchan) हिची.श्वेताने अलीकडे तिची मुुलगी नव्या नवेलीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी श्वेता बच्चन असं काही बोलून गेली की, सगळेच थक्क झालेत. भाऊ अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याला ट्रोल करणाऱ्यांवर श्वेता बरसली.  अभिषेक आणि तिच्या वडिलांची वारंवार होणारी तुलना चुकीची आहे, असं श्वेता म्हणाली. एका महानायकाची मुलं म्हणून जन्मास येणं कसं असतं? यावरही श्वेता बोलली.

ती म्हणाली, ‘फक्त एकच गोष्ट मला खटकते, मला पागल करते. ट्रोलर्स कायम अभिषेकवर तुटून पडतात आणि यामुळे माझं रक्त खवळतं. मला यामुळे त्रास होतो. लोक अभिषेकची तुलना माझ्या वडिलांसोबत करता, ते मला अजिबात आवडत नाही. लोक जेव्हा माझ्या वडिलांना ट्रोल करतात, तेव्हा मी ते फार मनावर घेत नाही. पण माझा भाऊ अभिषेकबद्दल मला वाईट वाटतं. यामुळे माझ्या भावाला अनेक गोष्टी भोगाव्या लागल्या.’

‘अभिषेक हा अनेकदा ट्रोलर्सला  मजेशीर उत्तर देवून गप्प करतो. स्वत:वर हसणे फार मजेशीर असतं, असं तो म्हणतो. पण मला मात्र या गोष्टींचा त्रास होतो. अनेक ट्रोलर्स हे सातत्याने अभिषेकला ट्रोल करत असतात. यामुळे माझे रक्त सळसळते. जेव्हा त्याला ट्रोल केले जाते, तेव्हा मला ते अजिबात आवडत नाही. कारण त्याची तुलना अशा अतुलनीय गोष्टींशी केली जाते. तो त्यांच्याप्रमाणेच असेल अशी अपेक्षा तुम्ही कशी काय करु शकता? त्यांचे संपूर्ण आयुष्य वडिलांसारखं कसं असू शकेल?  गेल्या २० वर्षांपासून या गोष्टी सुरु आहेत,’ असं श्वेता बच्चन म्हणाली. अभिषेकने 200 मध्ये ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. काही महिन्यांपूर्वी त्याचा दसवी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

टॅग्स :अभिषेक बच्चनअमिताभ बच्चनबॉलिवूडनव्या नवेली