Shreya Ghoshal buys luxury home in Santacruz West : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) सध्या चर्चेत आली आहे. अवघ्या काही दिवसांत तिने दुसरं आलिशान घर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे , गेल्या तीन महिन्यांतील खरेदी केलेली ही तिची तिसरी मोठी मालमत्ता आहे. श्रेयाची ही नवी गुंतवणूक नेमकी कुठे आहे आणि तिने घरासाठी नक्की किती कोटी मोजले आहेत? हे जाणून घेऊया सविस्तर.
श्रेया घोषालनेमुंबईतील अत्यंत पॉश मानल्या जाणाऱ्या सांताक्रूझ पश्चिम येथील सरोजिनी रोडवर हे नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे. 'CRE Matrix' च्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, या घराचे एकूण कार्पेट एरिया २,६०१ चौरस फूट असून, त्याला २९९ चौरस फुटांची बाल्कनी जोडलेली आहे. म्हणजेच सुमारे २,९०० चौरस फुटांचे हे प्रशस्त घर आहे. या आलिशान घराचे किंमत तब्बल २०.८८ कोटी रुपये आहे. या व्यवहारासाठी श्रेयाने १.२५ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरले आहे. तसेच या घरासोबत तीन गाड्यांसाठी पार्किंगची सोयही उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, श्रेयाने ही मालमत्ता आपले आई-वडील शर्मिष्ठा घोषाल आणि बिस्वजीत घोषाल यांच्यासोबत संयुक्तपणे खरेदी केली आहे. या व्यवहाराची अधिकृत नोंदणी २४ एप्रिल २०२६ रोजी पार पडली.
महिन्याभरापूर्वीच वरळीत खरेदी केले होते घर
श्रेया घोषाल सध्या रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच (१ एप्रिल २०२६) श्रेयाने मुंबईतील वरळी भागात गोदरेज ट्रायलॉजीमध्ये दोन आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. त्यातून वरळीतील समुद्राचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. वरळीतील त्या घरांची किंमत अंदाजे ६० कोटी रुपये होती. त्यासाठी तिने १.७८ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले होते. म्हणजेच, २५ दिवसांच्या आत श्रेयाने मुंबईच्या दोन वेगवेगळ्या प्राइम लोकेशनवर मालमत्ता खरेदी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
Web Summary : Shreya Ghoshal recently purchased a lavish apartment in Santacruz West for ₹20.88 crore, following her Worli property acquisition. The 2,900 sq ft home was jointly bought with her parents, marking her third major property investment in three months.
Web Summary : श्रेया घोषाल ने हाल ही में वर्ली में संपत्ति खरीदने के बाद, सांताक्रूज़ पश्चिम में ₹20.88 करोड़ का एक शानदार अपार्टमेंट खरीदा। 2,900 वर्ग फुट का घर संयुक्त रूप से उनके माता-पिता के साथ खरीदा गया था, जो तीन महीनों में उनका तीसरा बड़ा संपत्ति निवेश है।