Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायना नेहवाल बायोपिकमध्ये असा असणार श्रद्धा कपूरचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 10:32 IST

श्रद्धा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचे शूटिंग करत आहे. या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सायनाच्या लूकमध्ये श्रद्धा हुबेहुब तिच्यासारखी दिसते आहे.

ठळक मुद्देसायनाचा जीवनप्रवास खूप इंटरेस्टिंग - श्रद्धा कपूरसायनाची भूमिका चॅलेंजिंग - श्रद्धा कपूर

अभिनेत्री श्रद्धा कपूरने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तिचा नुकताच बत्ती गुल मीटर चालू चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या श्रद्धा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचे शूटिंग करत आहे. या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सायनाच्या लूकमध्ये श्रद्धा हुबेहुब तिच्यासारखी दिसते आहे. या बायोपिकच्या चित्रीकरणाला २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार आहेत व निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे.

सायना नेहवाल बायोपिकसाठी श्रद्धा कपूरने महिनाभर खूप मेहनत केली आहे. सकाळी सहा वाजता ती बॅडमिंटनचे ट्रेनिंग घेत होती. याबाबत ती सांगते की, या बायोपिकसाठी मी बॅडमिंटनचे चाळीस क्लासेस अटेंड केले आहेत. स्पोर्ट्स खूप कठीण आहे, पण मी खूप एन्जॉय केले. खेळाडूंची जीवनशैली आकर्षक असते. सायनाचा जीवनप्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. या प्रवासादरम्यान तिला झालेल्या दुखापतीपासून तिने जिंकलेल्या किताबापर्यंतचा तिचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. मी तिच्या जीवन प्रवासाशी रिलेट करू शकले कारण मला माझ्या क्षेत्रात तसाच अनुभव आला आहे. ती तिच्या ध्येयाबाबत खूप फोकस आहे आणि तिचा जीवनप्रवास खूप प्रेरणादायी आहे. श्रद्धा पुढे म्हणाली की, 'सायना ही देशाची चाहती असून, एक विजेती आणि यूथ आयकॉन आहे. कोणत्याही कलाकारसाठी ही भूमिका चॅलेंजिंग आहे. मला आशा आहे की मी केलेली ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल.'सायनाने २०१२ मध्ये लंडन ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली होती. तसेच जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही पदक जिंकले होते. 

टॅग्स :श्रद्धा कपूरसायना नेहवाल