Join us

श्रद्धा कपूरचा आवडता मराठमोळा पदार्थ कोणता? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 17:46 IST

श्रद्धाचं मराठी प्रेम पुन्हा एकदा चर्चेत आलंय. श्रद्धाला महाराष्ट्रीयन पदार्थ खायला खूप आवडतात.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor ) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिच्या 'स्त्री 2' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. श्रद्धा कपूरचे जगभरात चाहते आहेत. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला कोणता पदार्थ सर्वाधिक आवडतो याबद्दल सांगितले.

श्रद्धाचं मराठी प्रेम पुन्हा एकदा चर्चेत आलंय. श्रद्धाला महाराष्ट्रीयन पदार्थ खायला खूप आवडतात. लल्लनटॉपशी बोलताना श्रद्धाने तिला आवडणाऱ्या मराठमोळा पदार्थाविषयी सांगितलं. श्रद्धाने तिला वरण-भात खायला खूप आवडतो, असे सांगितलं.  श्रद्धा कपूर ही 'खवय्या असून तिला विविध पदार्थांची चव चाखायाची फार आवड आहे.

श्रद्धा कपूरचे वडील अभिनेते शक्ती कपूर हे पंजाबी आहेत तर आई शिवांगी कोल्हापूरे या मराठी आहेत. त्यामुळे श्रद्धावर कोल्हापूरचे मराठी संस्कार आहेत. इतकंच नाही श्रद्धा मराठी खूप छान बोलते. याशिवाय तिला मराठी संस्कृतीची जाणदेखील आहे. श्रद्धाच्या वागण्यातून, बोलण्यातून प्रत्येक कृतीमधून तिच्यातील संस्कार दिसून येतात. श्रद्धा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असते. वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

टॅग्स :श्रद्धा कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडमराठी