Join us

श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:26 IST

श्रद्धाचा आतापर्यंतचा सर्वात क्युट व्हिडिओ पाहिलात का?

बॉलिवूडची ब्लॉकबस्टर 'स्त्री' श्रद्धा कपूर  एक हिट देऊन जणू गायबच झाली आहे. 'छावा' फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांच्या आगामी सिनेमात श्रद्धा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये ती नृत्यांगनेची भूमिका करणार आहे ज्यासाठी सध्या श्रद्धा जोरदार तयारी करत आहे. दरम्यान वैयक्तिक आयुष्यात श्रद्धा राहुल मोदीला डेट करत आहे. नुकताच तिने एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला असून तो राहुलनेच शूट केला आहे.

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय आहे. तिचे तब्बल ९३.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तसंच इन्स्टाग्रामवर तिच्या पोस्ट आणि कॅप्शन्स इंटरेस्टिंग असतात. त्यातून तिचा साधेपणा आणि मराठमोळं वागणं दिसून येतं. इतकंच नाही तर ती चाहत्यांच्या कमेंट्सवर रिप्लायही करत असते. म्हणून ती सोशल मीडियावर चाहत्यांची सर्वात लाडकी सेलिब्रिटी आहे. श्रद्धा फार कमी वेळा ट्रोल झाली आहे. कालच श्रद्धाने एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये  ती विचित्र हावभाव करताना दिसतेय. मध्येच 'हट...' असं म्हणतेय. हा व्हिडिओ तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदीनेच शूट केला आहे. तिने 'हट..'म्हटल्यावर राहुलचाही आवाज ऐकू येतो. श्रद्धाने यासोबत कॅप्शन लिहिले, 'कोणीतरी असा शोधा जो असे नखरे सांभाळेल'. असं 'हट' ऐकणारा कोणाजवळ आहे?'.

श्रद्धाच्या या व्हिडिओवर नेटकरी पोट धरुन हसले आहेत. एका मुलाखतीत श्रद्धा म्हणालेली की तिला असा जोडीदार हवा ज्याच्यासमोर ती विचार न करता कशीही वागू शकेल. तिच्या या व्हिडिओवरुन तिला अगदी मनासारखाच जोडीदार मिळाल्याचं दिसून येतं. श्रद्धा ३८ वर्षांची असून ती लग्न कधी करणार याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान सध्या श्रद्धाचा लग्नाची प्लॅन नसून तिने आपल्या प्रेमाची कबुली मात्र जाहिररित्या दिली आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूडव्हायरल व्हिडिओ