बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याच्या आगामी पौराणिक चित्रपट 'महावतार' (Mahavatar) मुळे चर्चेत आहे. भगवान परशुरामांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात विकीसोबत कोणती अभिनेत्री झळकणार, याबाबत गेले अनेक दिवस चर्चा होती. यात दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसले, असं बोललं जात होतं. मात्र, आता ताज्या वृत्तानुसार, दीपिकाला वगळून एका दुसऱ्याच ब्लॉकबस्टर अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ती अभिनेत्री म्हणजे खुद्द 'मॅडॉक फिल्म्स'ची लाडकी स्त्री श्रद्धा कपूर आहे.
'मिड-डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजन यांनी 'महावतार'मधील महत्त्वाच्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरशी बोलणी सुरू केली आहे. ८०० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या 'स्त्री २' नंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. 'महावतार' चित्रपटाच्या टीमला अशा एका अभिनेत्रीची गरज होती, जिची 'स्टार पॉवर' जबरदस्त आहे आणि जी पौराणिक भूमिकेला न्याय देऊ शकेल. या निकषांत श्रद्धा अगदी चपखल बसत असल्याचे निर्मात्यांचे मत आहे.
विकी-श्रद्धाची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर'महावतार'च्या निमित्ताने प्रेक्षकांना एक नवी कोरी जोडी पाहायला मिळणार आहे. विकी कौशल आणि श्रद्धा कपूर यांनी यापूर्वी कधीही एकत्र काम केलेले नाही. या नव्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
चित्रपटाचं स्वरूप आणि शुटिंगची तारीखहा चित्रपट भगवान परशुरामांच्या आख्यायिकेवर आधारित आहे. 'मॅडॉक फिल्म्स' हा चित्रपट अत्यंत भव्य प्रमाणावर तयार करत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात असली, तरी तो २०२७ पर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या जून महिन्यानंतर चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होऊ शकते.
Web Summary : Shraddha Kapoor may star opposite Vicky Kaushal in 'Mahavatar' as Deepika Padukone exits. Makers wanted powerful actress to portray the mythological role. Shooting may begin June 2024.
Web Summary : विक्की कौशल की फिल्म 'महावतार' में दीपिका पादुकोण की जगह श्रद्धा कपूर नजर आ सकती हैं। निर्माताओं को पौराणिक भूमिका के लिए एक दमदार अभिनेत्री की तलाश थी। शूटिंग जून में शुरू हो सकती है।