Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा कपूरला डेंग्यूतून वाटले बरे, सुरूवात केली ह्या सिनेमाच्या चित्रीकरणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 17:13 IST

श्रद्धा कपूर ऑक्‍टोबरच्या सुरुवातीला डेंग्यूमुळे आजारी पडली होती. त्यामुळे तिला सायना नेहवालच्या बायोपिकचे चित्रीकरण थांबवायला लागले होते.

ठळक मुद्देश्रद्धाने सायनाच्या बायोपिकच्या शुटिंगला केली पुन्हा सुरुवात

बॉलिवूडची आशिकी गर्ल म्हणजेच श्रद्धा कपूर ऑक्‍टोबरच्या सुरुवातीला डेंग्यूमुळे आजारी पडली होती. त्यामुळे तिला सायना नेहवालच्या बायोपिकचे चित्रीकरण थांबवायला लागले होते. आता ती डेंग्यूमधून पूर्ण बरी झाली असून लवकरच ती सायनाच्या बायोपिकच्या शुटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. तिने स्वतः ट्विट करून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

श्रद्धाने ट्विटरवर लिहिले की, 'मी बरी झाली आहे आणि पुन्हा शुटिंगवर रुजू झाली आहे. माझा परिवार आणि माझे चाहते हेच माझे बॅक बोन आहेत. त्यांच्याच पाठिंब्याच्या आधारे मी बरी होऊ शकली आहे.' ती काम करत असलेल्या सिनेमाच्या युनिटनेही तिला दिलेल्या शुभेच्छांबद्दल तिने सर्वांचे आभार मानले आहेत. एक महिनाभर घरी राहिल्यानंतर घरच्यांसोबत राहण्याचा आनंद आपल्याला मिळाला असल्याचेही तिने म्हटले आहे. ती घरी असतानाच्या काळात सिनेमाचे शुटिंग थांबले नव्हते. या काळात सायनाच्या बालपणच्या काळातील शुटिंग पूर्ण करण्यात आले. 

सायना नेहवाल बायोपिकसाठी श्रद्धा कपूरने खूप मेहनत केली आहे. याबाबत ती सांगते की, या बायोपिकसाठी मी बॅडमिंटनचे चाळीस क्लासेस अटेंड केले आहेत. स्पोर्ट्स खूप कठीण आहे, पण मी खूप एन्जॉय केले. खेळाडूंची जीवनशैली आकर्षक असते. सायनाचा जीवनप्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. या प्रवासादरम्यान तिला झालेल्या दुखापतीपासून तिने जिंकलेल्या किताबापर्यंतचा तिचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. मी तिच्या जीवन प्रवासाशी रिलेट करू शकले कारण मला माझ्या क्षेत्रात तसाच अनुभव आला आहे. ती तिच्या ध्येयाबाबत खूप फोकस आहे आणि तिचा जीवनप्रवास खूप प्रेरणादायी आहे. श्रद्धा पुढे म्हणाली की, 'सायना ही देशाची चाहती असून, एक विजेती आणि यूथ आयकॉन आहे. कोणत्याही कलाकारसाठी ही भूमिका चॅलेंजिंग आहे. मला आशा आहे की मी केलेली ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल.'

टॅग्स :श्रद्धा कपूरसायना नेहवाल