बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचं सौंदर्य आणि अभिनयाचे जगभरात लाखो चाहते आहेत. श्रद्धानं आपल्या अभिनय कौशल्यानं चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. खऱ्या आयुष्यातील तिचा प्रेमळ आणि निरागस स्वभाव प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला आहे. श्रद्धा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी कधीही एखाद्या विषयावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. आता श्रद्धाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये कायम हसरी आणि सर्वांशी प्रेमाने वागणारी श्रद्धा ही एका पत्रकारावर चिडलेली दिसून येत आहे.
श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या यशामुळे प्रचंड चर्चेत आहे. 'स्त्री 2' चित्रपटामुळे श्रद्धा कपूरच्या प्रसिद्धीत आणखी वाढ झाली आहे. नुकतंच ती 'आज तक अजेंडा' या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी पत्रकाराने श्रद्धाला अभिनेता कार्तिक आर्यनचं नाव घेत एक प्रश्न विचारला. "तुला कोणत्या अभिनेत्रीला डेट करायला आवडेल, असं आम्ही कार्तिक आर्यनला विचारलं होतं. त्याच चार अभिनेत्रीचे पर्याय देण्यात आले होते. त्यात तुझ्या नावाचाही पर्याय होता, पण कार्तिक म्हणाला की, या सगळ्याच अभिनेत्री कोणाला तरी डेट करत आहेत. कार्तिकनं हे सांगितलं. हे खरंय का? यावर श्रद्धा संतापली.
श्रद्धानं संयम राखत पत्रकाराला म्हटलं, "कार्तिकने त्याला जे म्हणायचं होतं ते त्यानं सांगितलं. तुम्हाला माझ्यासाठी काही प्रश्न आहेत का ?" यानंतरही पत्रकाराने पुन्हा तिला "कोणाला डेट करत आहे का?" हा प्रश्न केला. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात खाजगी आयुष्याबद्दलचा प्रश्न ऐकताच श्रद्धा भडकली. राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. श्रद्धाच्या या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. श्रद्धाचं चाहते कौतुक करत आहेत. तिची ही शैली काही लोकांना आवडली. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, श्रद्धा सध्या राहुल मोदी यास डेट करत असल्याची चर्चा आहे.