Join us

श्रद्धा कपूरच्या गळ्यातील चेनमध्ये कुणाच्या नावाचं पेंडंट, 'R' नक्की आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 16:26 IST

श्रद्धाच्या एका फोटोनं सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले आहेत. दमदार अभिनयाचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.  नुकतंच श्रद्धाच्या एका फोटोनं सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. 

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं 'कुछ नहीं ब्रो, संडे है तो कुछ नहीं कर रही' असं कॅप्शन देत पोस्ट केला आहे. या फोटोत श्रद्धाच्या गळ्यात एक चैन दिसून येत आहे. त्या चैनमध्ये  'R' नावाचं पेंडंट असल्याचं पाहायला मिळत आहे. तर श्रद्धाने हे  'R' नावाचं पेंडंट कुणाच्या नावावरुन घातल्याचा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही चाहत्यांनी याचा संबंध श्रद्धाचा रुमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीशी लावला आहे. 

श्रद्धानं तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीच्या नावाचं हे पेंडंट घातल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. श्रद्धा ही राहुल मोदीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.  हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र, आजपर्यंत श्रद्धा आणि राहुलने डेटिंगच्या बातम्यांवर मौन बाळगलं आहे. राहुल मोदी बॉलिवूड चित्रपटांचा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे.

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'तू झुठी मै मक्कार' चित्रपटात रणबीर कपूरबरोबर तिने स्क्रीन शेअर केली होती. यातील तिची आणि रणबीर कपूरची जोडी खूपच पसंत केली गेली.  शिवाय, राजकुमार रावसोबत 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'स्त्री २' ऑगस्ट २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरसेलिब्रिटीबॉलिवूड