Join us

क्या बात है! चाहत्याचे श्रद्धासोबत ठुमके, 'शो मी द ठुमका' गाण्यावर डान्स Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 13:37 IST

'तू झुठी मै मक्कार' सिनेमातील 'शो मी द ठुमका' हे गाणं सध्या खूप गाजतंय.

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आगामी 'तू झुठी मै मक्कार' (Tu Jhuthi Mai Makkar) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून ती वेगवेगळ्या शहरात जाऊन प्रमोशन करताना दिसत आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कधी वडापाव तर कधी मिसळवर ताव मारतानाचे तिचे व्हिडिओ नुकतेच व्हायरल झाले होते. आता तिचा एका चाहत्यासोबतचा विमानतळावरील व्हिडिओ चर्चत आहे.

'तू झुठी मै मक्कार' सिनेमातील 'शो मी द ठुमका' हे गाणं सध्या खूप गाजतंय. विशेष म्हणजे तरुणाईला या गाण्याने वेड लावलंय.या गाण्याच्या डान्स स्टेप्सही व्हायरल होत आहेत. नुकतीच श्रद्धा मुंबई विमानतळावर दाखल झाली असता एका चाहत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. खरंतर त्याच्या ठुमक्याने श्रद्धासह सर्वांनाच प्रभावित केले. श्रद्धानेही त्याच्यासोबत गाण्याची स्टेप केली. तसंच 'क्या बात है!' म्हणत त्या चाहत्याला दादही दिली. सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

श्रद्धा या व्हिडिओत खूपच क्यूट दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि गुलाबी रंगाची लुझ पॅंट घातली आहे. 'किती क्यूट दिसत आहे श्रद्धा' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

Shraddha Kapoor : Video - कडक! श्रद्धा कपूरने वाढदिवसाच्या दिवशी गरमा गरम 'वडापाव'वर मारला ताव; म्हणाली....

श्रद्धा आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ही फ्रेश जोडी 'तू झुठी मै मक्कार' सिनेमात दिसणार आहे. ही रोमॅंटिक कॉमेडी आहे. सध्या यातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत तर दोघांची केमिस्ट्रीही लक्ष वेधून घेत आहे. लव्ह रंजन (Luv Ranjan) यांनी सिनेमा दिग्दर्शित केला असून ८ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूररणबीर कपूरनृत्यसोशल मीडिया