'मेला' सिनेमातून घराघरात पोहचलेला अभिनेता फैसल खान(Faisal Khan)ने १८ ऑगस्ट रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्याने आमिर खान (Aamir Khan) आणि कुटुंबातील सर्व सदस्यांबद्दल धक्कादायक दावे केले. बराच काळ प्रसिद्धीपासून दूर असलेल्या या अभिनेत्याने यापूर्वी एक पत्र लिहून आमिर खान आणि कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली होती आणि आता त्याने आमिर खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने दावा केला आहे की, त्याला ब्रिटीश पत्रकार जेसिका हाइन्सपासून जान नावाचा मुलगा आहे.
फैसल खानने पत्रकार परिषदेत सांगितले की, ''जेव्हा मी माझ्या कुटुंबावर रागावलो होतो, तेव्हा मी एक पत्र लिहिले होते आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दल सांगितले होते की ते काय आहेत. माझे कुटुंब लग्नासाठी माझ्या मागे लागले होते. ते लग्न कर, लग्न कर असं सांगत होते. आमिरचे रीनासोबतचे लग्न तुटले होते आणि त्यावेळी तो ब्रिटीश पत्रकार जेसिका हाइन्ससोबत रिलेशनशीपमध्ये होता. तिच्यासोबत लग्न न करता त्याचे तिच्यासोबत एक मूलही आहे. पत्रात मी लिहिले होते की, तो त्यावेळी किरणसोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होता. माझ्या वडिलांनी दोन लग्न केली होती. माझ्या चुलत बहिणीनेही दोन लग्न केलीत. तर मी म्हणत होतो की तुम्ही लोक मला का सल्ला देत आहात.''
अशी झालेली आमिर आणि जेसिकाची भेटगेल्या काही दिवसांपासून आमिर खान त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलू लागला आहे. मात्र, त्याने याबद्दल कधीही सांगितले नाही, जे आता त्याचा भाऊ फैसलने सांगितले आहे. २००५ साली 'स्टारडस्ट' मासिकात प्रकाशित झाले होते की, सितारे जमीन पर फेम अभिनेता जेसिकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, सुपरस्टारला ब्रिटीश पत्रकारापासून एक मूल देखील आहे, ज्याचे नाव जान आहे. आमिर 'गुलाम' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जेसिकाला भेटला होता.
आमिरने जेसिकाला अबॉर्शन करण्याचा दिलेला सल्लामॅगझिनच्या आर्टिकलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा जेसिका प्रेग्नेंट असल्याचे समजले तेव्हा आमिर खानने हे प्रकरण स्वीकारण्यास नकार दिला आणि तिला गर्भपात करण्यास सांगितले होते. मात्र तिने मुलाला जन्म देण्याचा आणि एकटी आई म्हणून त्याचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. २०००च्या सुरुवातीला तिने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव जान ठेवले. टाइम्स ऑफ इंडिया रिपोर्ट्सनुसार, जेसिकाने २००७ मध्ये लंडनमधील व्यावसायिक विल्यम टॅलबोटशी लग्न केल्याचे सांगितले होते.
आमिरच्या कथित मुलाचा फोटो व्हायरलजेसिकाच्या मुलाचा फोटो दोन वर्षांपूर्वी रेडिटवर व्हायरल झाला होता. तो पाहून लोकांनी म्हटले होते की, तो आमिर खानसारखा दिसतो. युजर्संने असेही म्हटले आहे की, अभिनेत्याने कधीही सार्वजनिकरित्या जानला जवळ केले नाही आणि त्याचा हल्लीचा फोटो ब्रिटिश वोगमध्ये प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये तो आता खूप मोठा झाला आहे. आणि अगदी त्याच्या कथित वडिलांसारखा दिसतो.