Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्या गोष्टीला ३१ वर्ष झाली..."; 'धुरंधर' मधील 'शिरानी'ला भेटताच काय म्हणाला अक्षय खन्ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:44 IST

'धुरंधर'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात शिरानीची भूमिकाही चांगलीच गाजली. अभिनेते बिमल ओबेरॉय यांनी ही भूमिका साकारली होती. अक्षय खन्नासोबतच्या काम करण्याच्या अनुभवावर बिमल काय म्हणाले?

सध्या 'धुरंधर २' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' सिनेमाने १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'धुरंधर २' सिनेमातील सर्वच अभिनेत्यांची चांगलीच चर्चा झाली. 'धुरंधर'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात शिरानीची भूमिकाही चांगलीच गाजली. अभिनेते बिमल ओबेरॉय यांनी ही भूमिका साकारली. 'धुरंधर'च्या पहिल्या भागात गाजलेलं फ्लिपर्ची गाणं बिमल आणि अक्षय खन्ना यांच्यावर शूट झालं होतं. अक्षय खन्नासोबतच्या काम करण्याच्या अनुभवावर बिमल काय म्हणाले?एका मुलाखतीत बिमल ओबेरॉय यांनी सांगितलं की, ''अक्षय खन्ना यांचा स्वभाव अबोल आहे. ते इंट्रोव्हर्ट व्यक्तिमत्त्वाचे माणूस आहेत. ते फारसे कोणाशी मिसळत नाहीत, पण कामाच्या बाबतीत अतिशय चोख असतात.'' बिमल यांनी अक्षय खन्नासोबतच्या पहिल्या सीनच्या वेळचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "आमचा पहिला सीन असा होता की, मी माझ्या गावात त्यांचे स्वागत करतो. त्यावेळी मी त्यांना सहज म्हणालो की, मी तुम्हाला ३० वर्षांनंतर पाहतोय."

हे ऐकताच अक्षय खन्ना चकीत झाला. बिमल यांनी आठवण सांगितली की, जेव्हा अक्षय खन्ना त्यांचा पहिला चित्रपट 'हिमालय पुत्र'च्या  शूटिंगसाठी डलहौसीला आले होते, तेव्हा बिमल अमृतसरमध्ये राहत होते. विनोद खन्ना साहेबही तिथे आले आहेत हे कळताच, बिमल आणि त्यांचा मित्र तब्बल ७-८ तास स्कूटर चालवत फक्त त्यांना पाहण्यासाठी गेले होते.

आपल्या कुटुंबाबद्दल, वडिलांबद्दल आणि करिअरच्या सुरुवातीबद्दलची ही गोष्ट ऐकून अक्षय खन्नाला खूप आनंद झाला. बिमल तिथून निघत असताना अक्षय खन्नाने त्यांना थांबवलं आणि हसून म्हटले, "बिमल, या गोष्टीला ३० नाही तर ३१ वर्षे झाली आहेत!" , अशाप्रकारे अक्षय खन्नासोबतची 'धुरंधर' सिनेमाची ही खास आठवण बिमल रॉय यांनी शेअर केली. बिमल पुढे म्हणाले की, अक्षय खन्ना यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. जरी आमचा स्क्रीन टाइम जास्त नसला, तरी त्यांच्यासोबत घालवलेला तो वेळ माझ्यासाठी अविस्मरणीय होता.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar' reunion: Akshay Khanna's Surprising Reaction After 31 Years Revealed!

Web Summary : Bimal Oberoi shared an anecdote from 'Dhurandhar' with Akshay Khanna. Oberoi mentioned meeting Khanna 30 years prior. Khanna corrected him, saying it had been 31 years, making the reunion memorable.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगअक्षय खन्नाबॉलिवूड