Join us

'आता जास्त काम करणार नाही कारण...' शिल्पा शेट्टीने घेतला करिअरबाबतीत महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 12:51 IST

आता फारसे सिनेमे न करण्याचं शिल्पाने ठरवलं आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty)  बॉलिवूडमध्ये काम करुन तीस वर्ष झाली आहेत. आपल्या या कारकिर्दीत तिने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. विशेषत: 'धडकन' सिनेमा आजही प्रेक्षक आवडीने बघतात. नुकताच तिचा 'सुखी' हा सिनेमा रिलीज झाला. मात्र विशेष चालला नाही. आता फारसे सिनेमे न करण्याचं शिल्पाने ठरवलं आहे. यामागचं कारणही सांगितलं आहे.

शिल्पा शेट्टी म्हणाली,'मला आता जास्त काम करायचं नाही. मी आता फक्त माझ्या दोन्ही मुलांकडे पूर्ण लक्ष देणार आहे. त्यांना वेळ देणार आहे. कारण दोघंही मोठे होत आहेत. आता मी तेच प्रोजेक्ट घेईन जे वेळ देण्यालायक असतील. हा मी यावर्षी विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. तुम्ही मला कमी सिनेमांमध्ये बघाल यात शंका नाही पण जे चित्रपट करेन ते शानदार करेन.'

ती पुढे म्हणाली,'फिल्ममेकिंगच्या मर्यादा आता बदलल्या आहेत. ओटीटी, वेगवेगळे कंटेंट यामुळे आता इंडस्ट्रीत कोणताही सिनेमा थिएटरमध्ये येण्याआधी विचार केला जात आहे. मी नेमकी कोणत्या दिशेला जाते हे बघणं महत्वाचं आहे. एक कलाकार म्हणून जे मला इंटरेस्टिंग वाटेल त्यात मी काम करेन.'

शिल्पा शेट्टीचा एकच लाईफ मंत्रा आहे जो तिने आजपर्यंत पाळला आहे.'आयुष्य खूपच अनपेक्षित आहे नशिबात काय लिहिलंय माहित नाही म्हणूनच भूतकाळ आणि भविष्याविषयी विचार करु नका. जिथे आहात तिथे खूश राहा. जे काही होतं चांगल्यासाठीच होतं. अगदी वाईटही काहीतरी चांगल्यासाठीच होत असतं.'

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूड