Join us

Shilpa Shetty Dance : शिल्पा शेट्टीलाही मराठी गाण्याची भुरळ, 'बहरला हा मधुमास' वर केला डान्स; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 11:40 IST

सध्या सगळ्यांनाच 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्याने भुरळ पाडली आहे.

शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनीच सिनेमा दिग्दर्शित केला. चित्रपट रिलीज  व्हायच्या आधीच यातल्या 'बहरला हा मधुमास' हे गाणं प्रचंड हिट झालं. सोशल मीडियावर तर या गाण्यावरील डान्सच्या रील्सने वेडच लावलं होतं. आश्चर्य म्हणजे केवळ मराठीच नाही तर हिंदी प्रेक्षकही या गाण्यावर ताल धरु लागलेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही 'बहरला मधुमास' वर डान्स करण्याचा मोह आवरला नाही.

सध्या सगळ्यांनाच 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्याने भुरळ पाडली आहे. इन्स्टाग्रामवर तर या गाण्याचा धुमाकूळ आहे. भारतातच नाही तर सातासमुद्रापार देशातही या गाण्यावर डान्स स्टेप करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दरम्यान बॉलिवूडची 'धडकन' अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही बहरला मधुमास गाण्यावर डान्स करण्यास भाग पाडले आहे. शिल्पाने अगदी तशीच स्टेप करत मराठमोळ्या गाण्यावर डान्स केला आहे.

शिल्पाला मराठी गाण्यावर डान्स करताना पाहून मराठी प्रेक्षकही खूश झालेत. यावेळी शिल्पाने येल्लो ऑकर रंगाचा कुर्ता आणि प्लाझो परिधान केलं आहे. ज्यात शिल्पाचं सौंदर्य खुलून आलंय. तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीमराठी चित्रपटनृत्यसोशल व्हायरल