Join us
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special : अक्षय कुमारच नव्हे तर या अभिनेत्यासोबत शिल्पा शेट्टीचे अफेअर असल्याची झाली होती चर्चा, नाव वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 08:00 IST

शिल्पा प्रसिद्धीझोतात असताना शिल्पा आणि अक्षय कुमारच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. पण त्याचसोबत बॉलिवूडमधील आणखी एका सुपरस्टारसोबत तिचे नाव जोडण्यात आले होते.

ठळक मुद्देशिल्पाला तिच्या एका मुलाखतीच्या दरम्यान सलमान खान आणि तिच्या नात्याविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी शिल्पाने सांगितले होते की, आम्ही दोघे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. पण त्याशिवाय आमच्या दोघांमध्ये काहीही नाते नाहीये.

दोन दशकांपेक्षा जास्त आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस. ८ जून १९७५ मध्ये शिल्पाचा जन्म झाला. ‘बाजीगर’ या सिनेमातून तिने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली आणि पाठोपाठ जवळपास ४० सिनेमे करत बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.

शिल्पा प्रसिद्धीझोतात असताना शिल्पा आणि अक्षय कुमारच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘मै खिलाडी तू अनाडी’ या सिनेमाच्या सेटवर अक्षय आणि शिल्पा यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. ‘धडकन’ मध्ये अक्षय आणि शिल्पाने एकत्र काम केले. त्या काळात हे दोघेही लग्न करणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पण एका मासिकाने ही बातमी छापल्यावर शिल्पा इतकी नाराज झाली होती की, तिने या मासिकाविरोधात केस ठोकली होती. पण केवळ अक्षयच नव्हे तर सलमान खानसोबत देखील तिचे अफेअर असल्याच्या बातम्या काही काळ मीडियात गाजल्या होत्या. पण शिल्पा आणि सलमान हे केवळ खूप चांगले फ्रेंड्स होते आणि आजही त्यांची मैत्री तशीच टिकून आहे. त्यांनी औजार, गर्वः प्राईज अँड ऑनर, फिर मिलेंगे, शादी कर के फंस गया यार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक स्टेज शो मध्ये देखील ते एकत्र थिरकताना दिसले आहेत.

शिल्पाला तिच्या एका मुलाखतीच्या दरम्यान सलमान खान आणि तिच्या नात्याविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी शिल्पाने सांगितले होते की, आम्ही दोघे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. पण त्याशिवाय आमच्या दोघांमध्ये काहीही नाते नाहीये. आम्ही कधी अनेक वर्षं एकमेकांना ओळखत असलो तरी आम्ही कधी डेटवर देखील गेलो नाही.

ती पुढे म्हणाली होती की, सलमान हा खूपच चांगला असून त्याचे माझ्यासोबतच नव्हे तर माझ्या कुटुंबियांसोबत देखील खूपच चांगले संबंध आहेत. त्याची माझ्याप्रमाणेच माझ्या वडिलांसोबत खूपच चांगली मैत्री होती. तो अनेकवेळा मध्यरात्री माझ्या घरी यायचा. पण तो मला भेटण्यासाठी नव्हे तर माझ्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करायला यायचा. माझे वडील आणि तो सोबत ड्रिंक करायचे आणि कित्येक तास गप्पा मारत बसायचे. मी त्यावेळी मस्तपैकी झोपलेली असायचे. माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याला खूपच वाईट वाटले होते. सलमान आम्हाला घरी भेटायला आला, त्यावेळी खूपच उदास होता. कित्येक मिनिटे तो टेबलावर डोके ठेवून शांत बसला होता.

टॅग्स :शिल्पा शेट्टीअक्षय कुमारसलमान खान