भारतीय जनतेसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. शेरी सिंगने (Sherry Singh) 'मिसेस युनिव्हर्स २०२५' (Mrs. Universe 2025) चा प्रतिष्ठित मुकुट जिंकून इतिहास रचला आहे. मिसेस युनिव्हर्सचा हा सन्मान मिळवणारी शेरी सिंग ही पहिली भारतीय स्पर्धक ठरली आहे. फिलिपीन्सची राजधानी मनिला येथील 'ओकाडा' येथे 'मिसेस युनिव्हर्स'ची ४८ वी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जगभरातील १२० सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
शेरी सिंग मिसेस युनिव्हर्स जिंकणारी पहिली भारतीय
शेरी सिंगने 'मिसेस इंडिया २०२५'चा किताब जिंकल्यानंतर 'मिसेस युनिव्हर्स २०२५'मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. स्पर्धेत तिने केवळ सौंदर्यानेच नाही, तर तिच्या शांत आणि आत्मविश्वासपूर्ण स्वभाव, प्रभावी वक्तृत्व अशा गुणांनी तिने जगाचं लक्ष वेधलं. याशिवाय महिला सक्षमीकरण व मानसिक आरोग्य यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विचारांनी तिने परीक्षकांनाही प्रभावित केलं.
'हे यश प्रत्येक महिलेचे आहे'
'मिसेस युनिव्हर्स २०२५'चा मुकुट परिधान केल्यानंतर शेरी सिंग भावना व्यक्त करत म्हणाली की, "हा विजय फक्त माझा नाही, तर हा विजय त्या प्रत्येक स्त्रीचा आहे जिने मर्यादांच्या पलीकडे जाण्याचंं स्वप्न पाहिलं आहे. खरं सौंदर्य शक्ती आणि दयाळूपणा यात आहे, हे मला जगाला दाखवायचं होतं."
'मिसेस युनिव्हर्स' ही स्पर्धा केवळ शारीरिक सौंदर्याच नव्हे तर बुद्धिमत्ता, प्रेम आणि सामाजिक जबाबदारीचा सन्मान करते. 'यूएमबी पेजेंट्स'च्या राष्ट्रीय संचालिका उर्मिमाला बरुआ यांनी सांगितले की, "आम्हाला शेरीच्या क्षमतेवर नेहमीच विश्वास होता. तिच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारताला अभिमान वाटला आहे आणि देशाचं प्रतिनिधित्व करू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी एक नवीन बेंचमार्क सेट झाला आहे."
Web Summary : Sherry Singh made history as the first Indian to win Mrs. Universe 2025 in Manila. Representing India after winning Mrs. India 2025, she impressed judges with her confidence, communication skills, and focus on women's empowerment and mental health. This victory sets a new benchmark for Indian women.
Web Summary : शेरी सिंह मनीला में मिसेज यूनिवर्स 2025 का खिताब जीतने वाली पहली भारतीय बनकर इतिहास रच दिया। मिसेज इंडिया 2025 जीतने के बाद भारत का प्रतिनिधित्व करते हुए, उन्होंने अपने आत्मविश्वास, संचार कौशल और महिला सशक्तिकरण और मानसिक स्वास्थ्य पर ध्यान केंद्रित करके जजों को प्रभावित किया। यह जीत भारतीय महिलाओं के लिए एक नया बेंचमार्क स्थापित करती है।