Join us
Daily Top 2Weekly Top 5

"गर्भधारणा माझ्यासाठी घातक, आपल्या देशात...", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:40 IST

अभिनेत्रीला असा कोणता गंभीर आजार झाला?

सोशल मीडियावर राखी सावंत, शर्लिन चोप्रा या 'ड्रामा क्वीन' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या सतत काही ना काही कारणामुळए चर्चेत असतात. मध्यंतरी दोघींमधलं भांडणही चव्हाट्यावर आलं होतं. तर काही दिवसात पुन्हा त्या सोबत दिसल्या. शर्लिन चोप्रावर राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात आरोप झाले होते. आता नुकतंच शर्लिनने एका मुलाखतीत तिला झालेल्या एका गंभीर आजाराचा खुलासा केला.

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) म्हणाली, "मला असा आजार आहे ज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मला आयुष्यभर गोळ्या औषधं घ्यावी लागणार आहेत. मी दिवसातून तीन वेळा औषधं घेते. या आजारामुळेच मला कधी गर्भधारणाही होऊ शकत नाही. कारण यामुळे आई आणि मुलाला जीवाचा धोका आहे. म्हणूनच डॉक्टरांनी मला स्पष्टपणे कधीही प्रेग्नंसीचा विचार न करण्याचा सल्ला दिला आहे."

ती पुढे म्हणाली, "मला आई व्हायचं आहे पण मी स्वत: मूल जन्माला घालू शकत नाही. म्हणून मी आपल्या देशात मान्य असतील अशा इतर पर्यायांचा विचार करत आहे जे . मला तीन-चार मुलं हवी आहेत. प्रत्येक मुलाचं नाव 'अ' पासून असावं अशी माझी इच्छा आहे. कारण मला 'अ' पासून सुरु होणारी माझ्या फार जवळची आहेत."

"मला वाटतं आई होण्यासाठीच माझा जन्म झाला आहे. कारण जेव्हा जेव्हा मी मुलांचा विचार करते मला एक वेगळाच आनंद मिळतो. मुलांच्या येण्याच्या आधीच मी केवळ विचारानेच इतकी खूश असते.  मी काम करणं सुरुच ठेवेन. त्यांनाही सोबत घेऊन जाईन. सुरुवातीला मी नॅनी जी त्यांचा सांभाळ करेल."

शर्लिनला 'सिस्टमिक ल्यूपस एरिथेमेटोसस'(SLE) हा आजार झाला आहे. हा ऑटोइम्यून आजार आहे. यात रोगप्रतिकारशक्ती कमी कमी होत जाते. यामुळे त्वच, सांधे आणि इतर अवयवांवर याचा परिणाम होतो. 

टॅग्स :शर्लिन चोप्राप्रेग्नंसीबॉलिवूड