बॉलिवूडमध्ये कधी कोणाची मैत्री तुटेल सांगता येत नाही. एकेकाळी एकमेकांचे घट्ट मित्र-मैत्रीण असणारे आज तोंडही पाहत नाही. असाच एक किस्सा आहे सैफ अली खान (Saif Ali Khan) -अमृता सिंहचा (Amrita Singh). दोघांची अगदी खास मैत्रीण शीबा आकाशदीपशी (Sheeba Akashdeep Sabir) तिची मैत्री तुटली. याचं कारण त्यांचा पाळीव कुत्रा होतं. नक्की काय घडलं होतं वाचा.
अभिनेत्री शीबा आकाशदीपने नुकतीच 'पिंकव्हिला'ला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, "सैफ-अमृता आणि मी चांगले मित्र होतो. आम्ही शेजारीही होतो. बंगल्याच्या एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहत होतो. दरम्यान एकदा त्यांच्या पाळीव कुत्र्याने माझ्या पाळीव कुत्र्याला चुकून ठार मारलं. त्या दिवसापासून मी सैफ-अमृताशी बोलणं बंद केलं. मला खूप वाईट वाटलं होतं. अशा वेळी आपण अगदी बैचेन होतो. नंतर सैफ-अमृता जेव्हा माझ्या पतीला भेटायचे तेव्हा विचारायचे की 'ती आम्हाला कधीच माफ करणार नाही का?"
ती पुढे म्हणाली, "मला माझा पाळीव कुत्रा गेल्याचं खूपच वाईट वाटलं होतं. मी नंतर ते घरही सोडलं. मी तिथे राहूच शकत नव्हते. तो माझा खूप लाडका डॉग होता. यामुळेच माझा त्यांच्याशी संपर्कच तुटला."
शीबा आकाशदीप नुकतीच आलिया भटच्या 'जिगरा' सिनेमात दिसली. ९० च्या दशकात शीबाने बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. सलमान खान, अक्षय कुमार, सैफ अली खानबरोबर तिने स्क्रीन शेअर केली आहे.