बॉलिवूडची सौंदर्यवती मधुबाला यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची सध्या सिनेसृष्टीत जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून या भूमिकेसाठी 'धुरंधर' फेम अभिनेत्री सारा अर्जुन हिचे नाव आघाडीवर होते. मात्र, आता या शर्यतीत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली असून, सारा अर्जुन या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्याचे चित्र दिसत आहे. सध्याची सर्वात व्यग्र अभिनेत्री मधुबाला यांची भूमिका साकारण्यासाठी मेकर्सची 'टॉप चॉइस' ठरत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मधुबाला यांच्या बायोपिकसाठी आता शर्वरी वाघ हिच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात आहे. 'धुरंधर' फ्रँचायझीच्या यशानंतर सारा अर्जुनचे नाव अनेक मोठ्या चित्रपटांशी जोडले गेले होते, ज्यात धनुषच्या आगामी चित्रपटाचाही समावेश आहे. मात्र, मधुबाला यांच्या बायोपिकसाठी मेकर्स एका अशा चेहऱ्याच्या शोधात आहेत, जो या भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकेल आणि सध्या या शर्यतीत शर्वरीने सर्वांना मागे टाकले आहे.
या बहुप्रतिक्षित बायोपिकसाठी आतापर्यंत कल्याणी प्रियदर्शन, साई पल्लवी आणि अनीत पड्डा अशा अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चा झाली. मात्र, अद्याप कोणाचेही नाव अधिकृतपणे निश्चित झालेले नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन 'डार्लिंग्स' फेम दिग्दर्शिका जसमीत के. रिन करत आहेत. शर्वरीसोबत सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून, जर सर्व काही सुरळीत पार पडले, तर शर्वरीला पडद्यावर मधुबाला यांच्या रूपात पाहणे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरेल.
शर्वरी वाघ सध्या बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ती यशराज फिल्म्सच्या स्पाई युनिव्हर्समधील 'अल्फा' या चित्रपटात आलिया भट्टसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ती खलनायक बॉबी देओलशी दोन हात करताना दिसेल. शर्वरीच्या अभिनयाचे आणि कष्टाचे सध्या इंडस्ट्रीत कौतुक होत असून, एकामागून एक मोठे प्रोजेक्ट्स तिच्या पदरात पडत आहेत.
शर्वरीच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती इम्तियाज अली यांच्या 'मै वापस आऊंगा' या चित्रपटात झळकणार आहे, जो १२ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. मधुबाला यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीची भूमिका साकारणे हे कोणत्याही अभिनेत्रीसाठी मोठे आव्हान असते. आता शर्वरी या आव्हानाला कशी सामोरी जाते आणि मेकर्स तिच्या नावावर शिक्कामोर्तब कधी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Sharvari Wagh is now a top contender to play Madhubala in her biopic, surpassing Sara Arjun. Discussions are underway with director Jasmeet K. Reen. Other actresses previously considered include Sai Pallavi and Kalyani Priyadarshan. The final decision is pending.
Web Summary : मधुबाला की बायोपिक में शरवरी वाघ मुख्य भूमिका के लिए प्रबल दावेदार हैं, सारा अर्जुन से आगे। निर्देशक जसमीत के. रीन के साथ बातचीत जारी है। पहले साई पल्लवी और कल्याणी प्रियदर्शन पर भी विचार किया गया था। अंतिम निर्णय आना बाकी है।