Join us

परिणीती चोप्राची रोमँटिक पोस्ट, अनसिन फोटो शेअर करत म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 17:32 IST

परिणीती आणि राघवने नवीन वर्षाचे एकत्र स्वागत केले.

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा हे सध्या सर्वात चर्चेत असणारे सेलिब्रिटी कपल आहे. २४ सप्टेंबर रोजी एका शाही विवाह सोहळ्यात परिणीती-राघव विवाहबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्न झाल्यापासून परिणीती कायम चर्चेत आहे. परिणीती आणि राघवने नवीन वर्षाचे एकत्र स्वागत केले. दोघांनीही त्यांच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे 

परिणीती सध्या पती राघव चढ्ढासोबत लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. दोघांनी इन्स्टाग्रामवर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. फोटोंमध्ये हे कपल खूपच क्यूट दिसत आहे. कॅप्शनमध्ये लिहलं, 'ख्रिसमस आणि नवीन वर्ष माझ्या प्रिय व्यक्तीसोबत साजरे केलं'. तसेच राघव चढ्ढा यांनीदेखील चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

राघव चढ्ढा यांनीही परिणीतीसोबतचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं,  'ती मला सांता म्हणते. पण, खरं तरं मलाच सर्वांत सुंदर भेट मिळाली आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा'. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला.

परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ‘मिशन रानीगंज’ चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती. लवकरच परिणीती ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. 'चमकिला'मध्ये परिणीती ही दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. 

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूड