Join us
Daily Top 2Weekly Top 5

शमिता शेट्टी रुग्णालयात दाखल, बहिणीनेच रेकॉर्ड केला Video; नक्की झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 15:45 IST

शमिता शेट्टीला नक्की झालं काय?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहीण शमिता शेट्टीला (Shamita Shetty) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शमिताने स्वत:च व्हिडिओ शेअर करत तिची सर्जरी झाल्याची माहिती दिली आहे. तिची नुकतीच एंडोमेट्रियोसिस सर्जरी झाली असून तिने हॉस्पिटलच्या बेडवरुनच चाहत्यांसाठी व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामुळे शमिताच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

शमिता शेट्टीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला. यात ती म्हणते मला एंडियोमेट्रियोसिस चं निदान झालं आहे. महिलांनी हे नक्की काय आहे ते गुगल करा. ही नक्की काय समस्या आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. कारण कदाचित हे तुम्हालाही असेल आणि याची तुम्हाला कल्पनाही नसेल. हे खूपच वेदनादायी आणि अनकंफर्टेबल आहे. जेव्हा वेदना होते तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असतं. त्यामुळे तुमच्या शरीराचं ऐका आणि सकारात्मक राहा.'

यासोबत शमिताने कॅप्शनमध्ये लिहिले, "तुम्हाला माहितीये का जवळपास ४० टक्के महिला या आजारामुळे त्रस्त आहेत. अनेकांना याबद्दल माहितच नाहीए. मला माझ्या दोन्ही डॉक्टरांचे मानायचे आहेत. मला नक्की का वेदना होत आहेत हे ते सतत शोधत होते. आता मी सर्जरी केली असून पुढे निरोगी आयुष्य जगण्याकडे पाहत आहे."

सेलिब्रिटींनी शमिताला लवकर बरी हो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी, आई आणि बहिणीसह वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाऊन आली. तेथील त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूडसेलिब्रिटीहॉस्पिटल