Join us
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षांनी तो परत येतोय! मुकेश खन्नांनी शेअर केली 'शक्तिमान'ची पहिली झलक, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 14:22 IST

शक्तिमान १९ वर्षांनी पुन्हा भेटीला येत असून मुकेश खन्नांनी टीझर रिलीज केलाय (shaktimaan)

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा लाडका 'शक्तिमान' पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येणार आहे. 'शक्तिमान' बद्दल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होती. इतकंच नव्हे तर 'शक्तिमान'चा सिनेमा येणार असून त्यात रणवीर सिंग प्रमुख भूमिका साकारणार अशीही चर्चा होती. आता 'शक्तिमान'बद्दल मोठी अपडेट आली असून स्वतः मुकेश खन्नांनी 'शक्तिमान'चा टीझर रिलीज केलाय. त्यामुळे 'शक्तिमान' पुन्हा एकदा भेटीला येणार आहे,  यावर शिक्कामोर्तब झालाय. 

'शक्तिमान'चा टीझर रिलीज

मुकेश खन्नांनी 'शक्तिमान'चा टीझर रिलीज केलाय. यामध्ये 'शक्तिमान' नेहमीप्रमाणे गिरक्या घेत एन्ट्री घेतो. पुढे त्याच जोशपूर्ण अंदाजात 'शक्तिमान' प्रेक्षकांना संबोधताना दिसतात. 'शक्तिमान'च्या मागे क्रांतीकारकांचे फोटो असलेले दिसतात.  its time for him RETURN असं कॅप्शन देत 'शक्तिमान'चा टीझर रिलीज केलाय. आता 'शक्तिमान' मालिका रुपात समोर येणार की सिनेमा रुपात हे थोड्याच दिवसात कळेल.

मुकेश खन्नाच पुन्हा 'शक्तिमान'

गेल्या अनेक दिवसांपासून 'शक्तिमान'मध्ये रणवीर सिंग प्रमुख भूमिका साकारणार असं बोललं जात होतं. रणवीर सिंगसोबत मुकेश खन्नांची बोलणीही सुरु होती. परंतु काही दिवसांपूर्वी मुकेश खन्नांनी या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं सांगितलं. आता नुकत्याच आलेल्या टीझरनुसार रणवीर सिंग नाही तर मुकेश खन्ना स्वतःच 'शक्तिमान'च्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय. १९ वर्षांनी 'शक्तिमान' पुन्हा रिलीज होतोय. तब्बल ८ वर्ष ही 'शक्तिमान' मालिका दूरदर्शनवर सुरु होती.

टॅग्स :मुकेश खन्नाबॉलिवूड