Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुहाना-नयनतारासोबत शाहरुख खानने घेतलं व्यंकटेश्वराचं दर्शन, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 09:59 IST

'जवान' च्या रिलीजआधी शाहरुख खानने घेतलं दर्शन

शाहरुख खान (Shahrukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) सिनेमामुळे चर्चेत आहे. ३०० कोटी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. शाहरुखचे यात ५ वेगवेगळे लुक्स आहेत. रिलीजपूर्वी शाहरुख नुकताच तिरुपतीच्या व्यंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याची लेक सुहाना खानही दिसली. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'जवान' सिनेमा रिलीज होण्यासाठी केवळ २ दिवस राहिले आहेत. याआधी शाहरुख खानने वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. तर आता तो तिरुपतीच्या व्यंकटेश्वर मंदिरात दाखल झाला. सिनेमातील त्याची सहकलाकार आणि साऊथ ब्युटी नयनताराही यावेळी दिसली. तसंच शाहरुखची लाडकी लेक सुहाना खाननेही दर्शन घेतले. अगदी पहाटेच तिघेही दर्शनासाठी पोहोचले. शाहरुख खानने पांढरा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. तर सुहाना खान पांढरा सलवार-सूटमध्ये अतिशय साधी दिसत होती. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'जवान'मध्ये पहिल्यांदाच शाहरुख खान आणि साऊथ ब्युटी नयनतारा यांची जोडी पाहायला मिळत आहे. 'चलेया' या गाण्यात त्यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. ७ सप्टेंबर रोजी सिनेमा रिलीज होतोय. चाहत्यांमध्ये 'जवान'ची कमालीची उत्सुकता आहे. पहिल्याच दिवशी सिनेमा १२५ कोटींची कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खाननयनतारासुहाना खान