Join us

Video: 'मन्नत'मध्ये मुलांसोबत फुटबॉल खेळताना दिसला किंग खान, चाहत्यांना वेगळीच काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:42 IST

शाहरुख प्रोफेशनल यश एन्जॉय करत असतानाच आपल्या कुटुंबालाही वेळ देतोय.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'चार्म' परत आला आहे. 2023 या वर्षात शाहरुखने बॅक टू बॅक तीन सुपरहिट चित्रपट दिले. 'पठाणट, 'जवान' आणि 'डंकी' अशा तीन सुपरहिट सिनेमांमुळे त्याची जादू बिग स्क्रीनवर दिसली. तब्बल चार वर्षांनंतर त्याने हे तीन हिट दिले. सध्या शाहरुख प्रोफेशनल यश एन्जॉय करत असतानाच आपल्या कुटुंबालाही वेळ देतोय. नुकताच त्याचा मन्नतमध्ये मुलांसोबत फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईतील बांद्रा येथे शाहरुख खानचा आलिशान 'मन्नत' बंगला आहे. बंगल्यासमोरील लॉनवर शाहरुखची मुलं आर्यन आणि अबराम फुटबॉल खेळत आहेत. तर शाहरुख आणि इतर काही जण त्यांच्यासोबत खेळण्याचा आनंद घेत आहेत. मन्नतसमोरील एका इमारतीतून हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचं दिसतंय. शाहरुखच्या फॅन पेजेसवर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. व्हिडिओ या तिघांपैकी कोणीही स्पष्ट दिसत नाही मात्र चाहत्यांनी शाहरुखच्या प्रायव्हसीविषयी चिंता उपस्थित केली आहे. 

शाहरुखच्या चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, 'ज्याप्रकारे हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे हे पाहून वाटतं की काहीच प्रायव्हसी राहिलेली नाही'. 'घर असं असेल तर शाहरुख तर वर्ल्ड कपचंही आयोजन करेल' असं म्हणत एकाने त्याची चेष्टाही केली आहे.

शाहरुखचा आगामी सिनेमा कोणता असेल याबाबत अजून कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. सलमानसोबतच्या 'टायगर व्हर्सेस पठाण' सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. एप्रिल-मे मध्ये या सिनेमाचं शूट सुरु होईल अशी शक्यता आहे.

टॅग्स :शाहरुख खानआर्यन खानमुंबईबॉलिवूड