Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खानने 'या' अभिनेत्याकडून भाड्यावर घेतले २ फ्लॅट्स, महिन्याला भरणार 'इतके' रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:07 IST

करोडोंची संपत्ती असताना शाहरुख खानने भाड्यावर घेतले २ ड्युप्लेक्स फ्लॅट

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला (Shahrukh Khan) कशाची कमी आहे? असंच अनेकांना वाटत असेल. मुंबईत त्याचा २०० कोटी किंमतीचा 'मन्नत' बंगला आहे. शिवाय इतरही बक्कळ संपत्ती आहे. शाहरुखची पत्नी गौरी खानही बिझनेसवुमन आहे. इतकी श्रीमंती असतानाही शाहरुखने नुकतंच एका अभिनेत्याकडून २ ड्युप्लेक्स अपार्टमेंट भाड्यावर घेतले आहेत. ज्यासाठी तो करोडोंची किंमत मोजणार आहे. कोण आहे तो अभिनेता वाचा.

शाहरुख खानने त्याच्या बांद्रा येथील मन्नत बंगल्याजवळच २ लॅव्हिश ड्युप्लेक्स अपार्टमेंट भाड्यावर घेतले आहेत. यासाठी तो वर्षाला तब्बल २.९० कोटी रुपये भरणार आहे. याचा अर्थ तो महिन्याला २४.१५ लाख रुपये मोजणार आहे. शाहरुखने हे अपार्टमेंट अभिनेता, निर्माता जॅकी भगनानी (Jacky Bhagnani) आणि त्याची बहीण दीपशिखा (Deepshikha)  यांच्याकडून भाड्यावर घेतले आहेत. दोन्ही अपार्टमेंट पाली हिल स्थित पूजा कॅसा इमारतीत आहेत. या पॉश ठिकाणी अनेक बॉलिवूड स्टार्स राहतात. 

शाहरुखने जॅकी आणि त्याच्या बहिणीसोबत या अपार्टमेंटची डील केली आहे. दोन वर्षांसाठी त्याने हे भाड्यावर घेतलं आहे. मात्र शाहरुखचं या मागचं कारण समोर आलेलं नाही. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करत असतात. खरेदी विक्री करत असतात. शाहरुखचा मुलगा आर्यन खानचाही बांद्रा येथे फ्लॅट आहे. तर त्याची पत्नी गौरी खानचं स्वत:चं इंटिरियर डिझायनिंग स्टुडिओ आँणि एक रेस्टॉरंटही आहे.

सध्या शाहरुख आगामी 'किंग' सिनेमाच्या तयारित व्यस्त आहे. यामध्ये त्याच्यासोबत त्याची लेक सुहाना खानही आहे. तसंच 'मुंज्या' फेम अभय वर्मा याचीही मुख्य भूमिका आहे. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडजॅकी भगनानी