Join us

Video: "स्वतःचं मेडल राणीला दिलं आणि नंतर..."; राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात शाहरुखच्या निरागस स्वभावाने जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 08:56 IST

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शाहरुखच्या निरागस स्वभावाने सर्वांची मनं जिंकली आहेत

शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. शाहरुखला ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान देण्यात आला. शाहरुखसोबत यावेळी अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांनाही सर्वोत्कृष्ट कलाकारांचा सन्मान मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुखच्या निरागस स्वभावाने सर्वांची मनं जिंकली. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.

शाहरुखने स्वतःचं मेडल राणीला दिलं अन्...

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत '१२th फेल' चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता विक्रांत मेस्सी, शाहरुख खान, राणी मुखर्जी एकत्र दिसत आहेत. व्हिडिओत पाहायला मिळतं की, विक्रांतच्या हातात शाहरुख आणि राणीची मेडल असतात. तो दोघांनाही त्यांच्या नावाने मेडल देतो. पुढे राणी आणि विक्रांत मेडलवरची रिबिनची गाठ सोडून आपापलं मेडल घालतात. मात्र, शाहरुख मेडल घालण्यासाठी थोडा गोंधळलेला दिसतो.

व्हिडिओमध्ये दिसतं की, शाहरुख मेडलच्या रिबनची गाठ सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते जमत नाही. मग तो ते मेडल काढतो आणि राणीला देतो. शेवटी राणी शाहरुखच्या गळ्यात व्यवस्थित मेडल घालते आणि त्याला कॅमेऱ्यात त्याचा चेहरा दाखवते. हे पाहून शाहरुख हसतो. नंतर तो विक्रांतचे मेडल पाहतो आणि समाधानाने हसतो. यानंतर तो मागे बसलेल्या त्याची मॅनेजर पूजा ददलानीलाही मेडल दाखवतो. शाहरुखच्या या निरागस कृतीमुळे त्याच्या चाहत्यांंचं चांगलंच मन जिंकलंय. शाहरुखने त्याच्या मनातील लहान मूल अजून अजूनही जपून ठेवलंय, अशा कमेंट्स लोक करत आहेत.

टॅग्स :शाहरुख खानराणी मुखर्जीविक्रांत मेसीबॉलिवूडराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार