Join us

अबरामच्या शाळेत 'ये जो देस है तेरा' गाण्यावरील नृत्य बघताच शाहरुख खान भावुक, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 15:08 IST

शाहरुखच्या 'स्वदेस' सिनेमातील 'ये जो देस है तेरा' गाण्यावर अबरामच्या शाळेतील मुलांनी डान्स केला. तेव्हा किंग खानची प्रतिक्रिया काय होती, त्याचा व्हिडीओ समोर आलाय.

शाहरुख खानचा 'स्वदेस' सिनेमा सर्वांना माहित असेलच. या सिनेमातील सर्वच गाणी चांगलीच गाजली. 'स्वदेस'मधीस सर्वांच्या काळजाच्या जवळ असणारं असंच गाणं म्हणजे 'ये जो देस है तेरा'. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेस' सिनेमात 'ये जो देस है तेरा' गाणं ए.आर.रहमान यांनी गायलं. हे गाणं आजही तितकंच आवडीने ऐकलं जातं. जेव्हा या गाण्यावर अबरामच्या शाळेतील मुलांनी डान्स केला तेव्हा शाहरुखची प्रतिक्रिया काय होती याचा व्हिडीओ समोर आलाय. 

ये जो देस है तेरा वर नृत्य पाहताना शाहरुख भावुक

अबरामच्या शाळेत काल एक गॅदरींग झालं. यावेळी स्टारकिडच्या मुलांनी खास परफॉर्मन्स केलेला दिसला. शाहरुख खानही त्याच्या कुटुंबासोबत धाकटा लेक अबरामला चिअर अप करण्यासाठी उपस्थित होता. त्यावेळी अबरामच्या शाळेतील मुलांनी शाहरुखच्या 'स्वदेस' सिनेमातील 'ये जो देस है तेरा' गाण्यावर डान्स केला. तेव्हा हा डान्स बघून शाहरुख काहीसा भावुक झालेला दिसला. याशिवाय त्याने डान्स करणाऱ्या मुलांना दाद दिली. किंग खान गाणं गुणगुणतानाही दिसला.

शाहरुखच्या लेकाने केलं नाटकात काम

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान गुरुवारी रात्री त्याचा लेक अबरामच्या शाळेतील फंक्शनमध्ये पत्नी गौरी आणि लेक सुहानासोबत सहभागी झाला होता. त्यावेळी अबरामने एका नाटकात स्नोमॅनचं काम केलं. मुलाचा अभिनय बघताना शाहरुखही इमोशनल झालेला दिसला. अबरामच्या शाळेतील वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात शाहरुखचा लेक अबराम, ऐश्वर्या - अभिषेकची मुलगी आराध्या, करीना-सैफचा मुलगा तैमूर याशिवाय शाहिद-मीरा कपूरची मुलगी मिशा यांचे खास परफॉरमन्स होते.

 

टॅग्स :शाहरुख खानअबराम खानसुहाना खानगौरी खान