Join us

सुहानाला ज्युलिएटच्या भूमिकेत बघून शाहरुख खान गेला भारावून सोशल मीडियावर दिली 'ही' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 14:54 IST

शाहरुख खानची मुलगी सुहाना कोणत्या स्टार पेक्षा कमी नाहीय. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच सुहानाची मोठी फॅन फॉलोईंग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

ठळक मुद्देलंडनमधल्या एका कॉलेजमध्ये सुहाना आपलं शिक्षण पूर्ण करते आहेशाहरुख लेकीच नाटक पाहण्यासाठी लंडनला गेला होता.

शाहरुख खानची मुलगी सुहाना कोणत्या स्टार पेक्षा कमी नाहीय. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच सुहानाची मोठी फॅन फॉलोईंग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या फॅन्सना देखील तिचे फोटो चांगले पसंतीस पडतात. शाहरुखने यावेळी लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात तो सुहानाला प्रेमाने जवळ घेताना दिसतोय. या फोटोत सुहानाच्या हातात काही गुलाबाची फूल देखील आहेत. 

लंडनमधल्या एका कॉलेजमध्ये सुहाना आपलं शिक्षण पूर्ण करते आहे. तिने एका नाटकात भाग घेत त्यात ज्युलिएटची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.शाहरुख लेकीच नाटक पाहण्यासाठी लंडनला गेला होता. तिचे काम पाहून तो खूप भारावला. नाटक पाहिल्यानंतर शाहरुखने सुहाना आणि तिच्या टीमचे कौतूक केले आहे. सोशल मीडियावर   हा एक खूपच सुंदर अनुभव होता. सगळ्या कलाकारांनी अप्रतिम कामा केले आहे. ज्युलिएटसह संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा.  

काही दिवसांपूर्वी सुहाना ‘वोग’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली होती.  करण जोहर आणि शाहरुखचे खास मैत्रीपूर्ण संबंध असल्याने करणच्या चित्रपटामधूनच सुहाना बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. सुहानाला अभिनेत्री व्हायचे असल्याचे, तिने काजोलकडून अभिनयाचे बारकावे शिकावे, अशी शाहरुखची इच्छा आहे. याबाबत खुद्द शाहरुखने एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती.

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानकरण जोहर