Join us

मध्यंतरानंतरचा भाग आधीच दाखवला, शाहरुखचा 'जवान' तासाभरातच संपला? Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 13:21 IST

मूळची कराचीची असलेली शाहरुखची ही चाहती लंडनमध्ये राहते.

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'जवान' (Jawan) सध्या जगभर धुमाकूळ घालतोय. शाहरुखचे चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहतच होते. फक्त भारतातच नाही तर शाहरुखचे चाहते जगभर आहेत. परदेशातही शाहरुखचे चाहते 'जवान' बघत आहेत. मात्र लंडनमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी चाहतीला थिएटरमध्ये वेगळाच अनुभव आला. असं तिच्यासोबत याआधी कधीच घडलं नाही.

मूळची कराचीची असलेली शाहरुखची ही चाहती लंडनमध्ये राहते. ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तीन दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये तिने शाहरुखचा 'जवान' बघण्यासाठी किती उत्साहित आहे हे सांगितले. याच व्हिडिओत ती सांगते, 'थिएटरवाल्यांनी सेकंड पार्ट आधी चालवला आणि संपूर्ण सिनेमा १० मिनिटात संपवला. त्यानंतर आलं मध्यंतर. आम्हाला वाटलं की व्हिलन मेला आता कशी काय मध्यंतर आली. मग समजलं की मध्यंतरानंतरचा भाग आधीच दाखवला.'

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'तु्झ्यासाठी खूप वाईट वाटतंय, पण हे फारच मजेशीर आहे','हे तर एपिक कॉमेडी आहे','भारतात बनलेल्या एका चांगल्या सिनेमाची वाट लावल्याबद्दल त्यांच्यावर केस करा. ज्याचं रिफंड मिळूनही काही फायदा नाहीए' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

३०० कोटी बजेटमध्ये बनलेल्या 'जवान' सिनेमाने आतापर्यंत 316.16 कोटींची कमाई केली आहे. साऊथ दिग्दर्शक अॅटली कुमारचा हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत बनला आहे. 

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खानसिनेमालंडननाटक